अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या आंदोलनाची दखल
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रोफेसर चौकातील पूर्ण कृती पुतळा पंधरा दिवसात काम पूर्ण करून बसवण्याचे मनपाचे लेखी आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १४ मे जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्याच्या मागणीसाठी अनेक पत्रव्यवहार करून देखील अद्यापही कारवाई करण्यात आलेली नसल्याने छावा संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की १४ मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौकामध्ये ११ मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदन देण्यात आले होते या मागणीची दखल घेत महानगरपालिका शहर अभियंता मनोज पारखे यांनी लेखी पत्र दिले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळा बसवण्यासाठी चौथ्याऱ्याचे काम येथे पंधरा दिवसात पूर्ण करून पुतळा बसविण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी छावा संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, दत्ताभाऊ वामन, विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव पाचरणे, केशव बरकते, महेश चव्हाण, दीपक गहिले, योगेश पवार, किरण उंडे, सुनील ठाकरे, संतोष शिरसाठ आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, छावा संघटनेच्या वतीने प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दि. २ मे २०२२ रोजी व दि. २३ जून २०२२ रोजी पालकमंत्री यांना दि. १ मे २०२३ रोजी ना हरकत मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला असून त्यांचा पाठपुरावा आम्ही केला असून अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पण वरील दि. 2 मे २०२२ व २३ जून २०२२ रोजी पत्र देऊन सदर विभागाचे ना हरकत आलेली असून वर्क ऑर्डर झालेली असून काम चालू असून छत्रपती संभाजी राजे जयंती पूर्वी लवकरात लवकर पुतळा बसवण्यात यावा अन्यथा प्रोफेसर चौक अहमदनगर येथे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने ११ मे २०२४ रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले होते याची दखल घेत मनपाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण माघे घेण्यात आले.