अहमदनगर प्रतिनिधी – अरणगाव ग्रामपंचायत मालकीच्या दुकाना समोर होत असलेले अनधिकृत अतिक्रमण थांबून चौकशी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी अरणगाव येथील ग्रामस्थ व दुकानधारक बाळासाहेब खंडागळे,संदीप खंडागळे,ऋषिकेश खंडागळे,किसन खंडागळे,अमोल आमले, संदीप साखरे,अरणगाव ग्रामपंचायत उपसरपंच सागर कलापुरे,माजी उपसरपंच महेश पवार,सतीश पवार आदी उपस्थित होते.
अरणगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागामध्ये दुकान आहे.आम्ही तेथे व्यवसाय करत असून नियमितपणे मला नेमून दिलेला कर मी भरत आहे.परंतु गेल्या काही महिन्यापासून दुकानासमोर दिलीप कांबळे हा इसम अनधिकृत अतिक्रमण करत आहे.
आम्ही ग्रामपंचायत कार्यालयात लेखी स्वरुपात कळवले असून अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे दुकानासमोरील होत असलेल्या अतिक्रमणामुळे आमच्या व्यवसाय करण्यास अत्यंत अडचण निर्माण झाली असून ग्रामपंचायत कार्यालयाने दिलेल्या सर्व नियमाचा व आदेशाचे पालन करून आम्ही नियमित कर भरत असून सदरील दुकानाचा उपभोग घेत आहे.
तरी या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाची प्रशासनामार्फत चौकशी करून अतिक्रमण तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण चालू करण्यात आले आहे.
अशी मागणी बाळासाहेब खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.