अहमदनगर प्रतिनिधी – दीर्घ काळाच्या ध्येय प्राप्तीसाठी जसे की, मुला-मुलींचे उच्च शिक्षण, लग्न व निवृत्तीसाठी मुदत ठेवीपेक्षा म्युच्युअल फंड योग्य गुंतवणूक आहे. अर्थवेध इन्व्हेस्टमेंटस्मध्ये एस.बी.आय.म्युच्युअल फंडाच्या नवीन एन.एफ.ओ.मध्ये केलेली गुंतवणुक भविष्यात फायदेशीर ठरेल. अर्थवेध संस्था आपला पैसा चांगल्या स्कीममध्ये गुंतवणुक करुन त्याचा चांगला परतावा मिळवून देत असल्याने अनेकांना त्याचा फायदा होत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.स्नेहल इंगळे यांनी केले.
सावेडी येथील अर्थवेध इन्व्हेस्टमेंटस् या संस्थेत एस.बी.आय. म्युच्युअल फंडच्या नवीन एन.एफ.ओ. बॅलन्स अॅडव्हान्टेंज फंडचा शुभारंभ डॉ.स्नेहल इंगळे, बालरोग तज्ञ डॉ.चेतना धांडे-बहुरुपी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी एन.जे.मॅनेजर सचिन राणे, अर्थवेधचे संचालक प्रसाद भडके, संचालिका वैशाली भडके, युनियन बँकेचे विक्रीकर अधिकारी विरेंद्र भावसार, अर्थवेधचे विक्रीकर सदस्य अनिल धोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ.चेतना धांडे-बहुरुपी आपल्या भाषणात म्हणाल्या की, आर्थिक स्वास्थ्यासाठी प्लॅनिंग करुन भविष्यातील ध्येय समोर ठेवून गुंतवणुक केली पाहिजे. आपल्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच त्यांचे उच्च शिक्षण व उज्वल भविष्य साकारण्यासाठी बचतीपेक्षा म्युच्युअल फंडातून चांगला परतावा मिळतो. आपण साठवलेला पैसा योग्य मार्गदर्शन घेऊन महागाईच्या पेक्षा जास्त परतावा देणार्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतविला पाहिजे. यासठी अर्थवेध इन्व्हेस्टमेंटस्च्या माध्यमातून विविध पर्याय उपलब्ध आहेत.
अर्थवेधचे संचालक प्रसाद भडके म्हणाले, चढत्या किंवा उतरत्या बाजारात गुंतवणुकदार हे योग्य संधी गमावतात किंवा भावनांच्या प्रभावाने निर्णय घेतात. यामुळे योग्य गुंतवणुक केली जात नाही. गुंतवणुकीचा पाया कच्चा राहतो. एस.बी.आय बॅनल्सड् अॅडव्हानटेज फंड हा समतोल साधून परतावा देतो. गुंतवणुक करतांना संयम हा आवश्यक आहे. उज्वल भविष्याच्या ध्येय पुर्तीसाठी एकदा अर्थवेध इन्व्हेंटमेंटच्या कार्यालयास अवश्य भेट द्या, असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख मान्यवरांचा संचालिका वैशाली भडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गिरिष शिंदे यांनी केले तर आभार राजेंद्र पाटकुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिल शिंदे, मानसी संसारे, सागर शिंदे आदिंनी परिश्रम घेतले.