अहमदनगर ऑलिम्पिक असोसिएशन कडून ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा
गुणवत्ता वाढीसाठी खेळाडूंना मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर ऑलिम्पिक असोसिएशन व विविध क्रीडा संघटनेच्या वतीने शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये खेळाचे महत्त्व त्याचप्रमाणे आहाराविषयी माहिती देऊन खेळाडूंना ऑलिम्पिक दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. सरावादरम्यान घ्यावयाची काळजी यावर चर्चा करण्यात आली. क्रीडा संघटनांच्या प्रचार व प्रसारासाठी काय करता येईल? व खेळाडूंची गुणवत्ता कशी वाढवता येईल? यावर उपस्थित ज्येष्ठ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक व जिल्हा संघटना पदाधिकारी यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अहमदनगर ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी शैलेश गवळी, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, ॲथलेटिक्स असोसिएशनचे दिनेश भालेराव, आर्चरी असोसिएशनचे अभिजीत दळवी, शुभांगी दळवी, मल्लखांबचे नंदेश शिंदे, पॉवर लिफ्टिंगचे डेव्हिड मकासरे, टेबल टेनिसचे किरण पवार, फुटबॉलचे प्रदीप जाधव, टेनिस बॉल क्रिकेटचे अविनाश काळे, बॉक्सिंगचे शकील शेख, फेंसिनचे संदेश भागवत, कबड्डीचे प्रशांत गंधे, एरोबिक्स संतोष खैरनार, सौ. खैरनार, स्केटिंगचे प्रशांत पाटोळे, सतीश गायकवाड, बास्केटबॉलचे मुकुंद काशिद, खो-खो चे विकास परदेशी, सुनील गोडळकर, मनीष राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश गवळी यांनी केले. संजय साठे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संतोष खैरनार यांनी आभार मानले.