अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा संपन्न
सोसायटीच्या कामकाजाचे खासदार लंके कडून कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104 वी वार्षिक सभा खेळीमळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला. संस्थेच्या कामकाजाची माहिती घेत सोसायटीत मयत सभासदांच्या वारसास 2 लाखाची मदत, गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, सेवानिवृत्तांचा गौरव, सभासदांना कमीत-कमी व्याजदराने कर्ज वितरण या कामकाजाचे खासदार लंके यांनी कौतुक केले.
सन 1920 साली स्थापन झालेल्या व महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर पोस्टल सोसायटीची वार्षिक सभा हॉटेल यशग्रॅन्ड येथे संस्थेचे चेअरमन रामेश्वर ढाकणे यांच्या अध्यक्षेतखाली झाली. ढाकणे यांनी संस्था सभासदांना अल्प व्याजदराने मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी 25 लाख रुपये कर्ज दिले जात आहे. कर्जाची वसुली पगारातून नियमीतपणे होत असल्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालली आहे. संस्थेने आपला ऑडिट अ वर्ग कायम राखून या वर्षी सभासदांना कायम ठेवीवर 11 टक्के व्याज व शेअर्स वर 7 टक्के लांभाश सभासदांच्या पोस्टल सेव्हीग्ज खात्यामध्ये वर्ग केलेला असल्याची माहिती दिली.
यावेळी सभासदांच्या इयत्ता पहिली ते पदवीपर्यत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वर्कीग प्रेसिडेंट ऑल इंडीया पोस्टल एम्प्लॉईज न्यू दिल्लीचे सुरेंद्र पालव, जनरल सेक्रेटरी राजेश सारंग, माजी जनरल सेक्रेटरी बाळकृष्ण चाळके, अहमदनगर पोस्ट विभागाचे डेप्युटी प्रवर अधिक्षक बाळासाहेब बनकर, डाक अधिक्षक संदीप हदगल, अमित देशमुख, देविदास गोरे, सेवानृित्त वरिष्ठ अधिक्षक राम धस आदींच्या हस्ते रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त सभासंदाचा देखील यावेळी सत्कार करण्यात आले.
संस्थेचे कार्यकारी संचालक प्रफुल्लकुमार काळे यांनी सूत्रसंचालन केले. अमीत कोरडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक सुनील कुलकर्णी, निसार शेख, महेश तामटे, प्रमोद कदम, किशोर नेमाने, सलीम शेख, शिवाजी कांबळे, स्वप्ना चिलवर, अर्चना दहिंडे, बळी जायभाय, व्यवस्थापक नितीन वाघ, आंनद भोंडवे, सुनील भागवत, सतीश येवले, दिपक जसवाणी, सचिन देवकाते, गणेश केसकर, अंबादास सुद्रीक, बलराम दाते, विजय कोल्हे, महेश कोबरने, सुनील चांडोले, विजय चाबुकस्वार, कैलास भुजबळ, अरविंद वालझाडे, संदीप मिसाळ, सुखदेव पालवे, वेदशास्त्री वाके, गोरक्ष आचार्य, राजकुमार कुलकर्णी, जय मडावी, अर्जुन जटाळे, शंकर कडभणे, सुनील जाधव, देवेंद्र शिंदे, शुभांगी सस्कर, ज्योती कांबळे, पद्मराज पडलवार, जावेद शेख आदीसह मोठ्या संख्येने सभासद हजर होते.