अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर महानगरपालिका आणि रेडिओ सिटी 91.1 एफ एम यांच्या वतीने आयोजित दिव्यांग आणि बेड रिडन नागरिकांच्या लसीकरणाला आज दिनांक -०६/०९/२०२१ रोजी अहमदनगर महानगरपालिका उपायुक्त श्री.यशवंत डांगे , कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान, आर जे प्रसन्न पाठक यांचे उपस्थितीत सुरुवात झाली आहे.
पहिल्या दिवशी सावेडी विभागातील नोंदणी केलेल्या दिव्यांग आणि बेड रिडन लोकांना लस देण्यात येत आहे. यावेळी दक्षता पथक सहायक श्री.नंदकुमार नेमाने, श्री.राहुल साबळे,श्री.सूर्यभान देवघडे,श्री.भास्कर आकुबत्तीनं, श्री.अमोल लहारे,श्री.अनिल आढाव, श्री.राजेश आनंद,श्री.विष्णू देशमुख, श्री.राजू जाधव, श्री.रिजवान शेख, श्री.रवींद्र सोनवणे उपस्थित होते.
लसीकरण करण्यासाठी महापालिका सिव्हिल आरोग्य केंद्राचे डॉ. मनोहर देशपांडे, सिस्टर ज्योती बांगर, स्नेहलता क्षेत्रे,वर्षा कोल्हे,डेटा ऑपरेटर ओंकार अंकाराम यांचे सहकार्य लाभले.
सुरवातीला ५० नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यात येत असून सदर मोहीम पुढेही सुरू असणार आहे.
आपल्या कुटुंबातही जर कोणी दिव्यांग किंवा बेड रिडन व्यक्ती असेल तर आपण त्यांचे नाव नोंदवू शकता आणि या सुविधेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी 77 18 911 911 या नंबर वर लस घ्यायची असलेल्या व्यक्तीचे नाव आणि लसिकरण केंद्रापर्यंत का पोहोचू शकत नाही त्याचे कारण टाकावे. असे आवाहन आयुक्त श्री.शंकर गोरे ,आरोग्य अधिकारी डॉ.श्री.सतीश राजूरकरसर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी केले आहे.