आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याची मागणी

- Advertisement -

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्याची मागणी

कोतवाली पोलीस हे आरोपीस मदत करत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव देवी रोड एकता कॉलनी येथील माया हिरामण डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी मुलगी अर्चना अमोल गायकवाड हिने ६ मे २०२४ रोजी पतीच्या घरात उपस्थित असताना गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळून आली. त्या दिवशी आम्ही सर्व घटनास्थळी गेलो असता तिचा नवरा अमोल गायकवाड तेथून पळून गेला त्यानंतर आम्ही कोतवाली पोलीस स्टेशन येथे गेलो असता त्यावेळी फिर्याद घेतली नाही. तेथे म्हणाले की आम्ही पंचनामा करू पोस्टमार्टम होईल व त्यानंतर तुमची तक्रार घेऊ त्यावेळी अमोल गायकवाड याचा तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले त्यानंतर मुलगा आकाश डंबाळे याच्या फिर्यादीवरून ८ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी संपूर्ण मदत आरोपींनाच केली. अमोल रत्नाकर गायकवाड यास अटक केलेली नाही यातील आरोपी रत्नाकर हरिभाऊ गायकवाड हे पोलीस खात्यातून निवृत्त आहे त्यामुळे पोलिसांनी त्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे पोलीस हे कुठलेही प्रकारे व्यवस्थित तपास करत नाही जाणीवपूर्वक आरोपींनी मदत होईल असे वर्तन तपसी अधिकारी यांचे आहे.
कुठलाही सखोल तपास पोलीस करत नाही वेळोवेळी विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यामुळे सदर गुन्ह्यातील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन तातडीने आरोपी अमोल गायकवाड, रत्नाकर गायकवाड, प्रमोद गायकवाड, सविता रणदिवे यांना अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन समस्त केडगाव ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले यावेळी माया डंबाळे समवेत साधनाताई बोरुडे, रंजना उकिरडे, सुरेखा फुलपगार, रेणुका पुंड, राणी भाकरे, आरती उफाडे, सुरेखा बन, अनिता कचरे, मनीषा सानदकके, वैशाली पाठक, माया भंडारे, हिरा विनोद, रोजा भिंगारदिवे, वनिता सूर्यवंशी, अंजना हटाळे, विजय शिंदे, ज्योती जाधव, संध्या पावसे, छाया चिपाडे, सुनीता डंबाळे, अनिता पिसाळ, सुनिता काकडे, कविता मोहिते, जयश्री पुंड, एस. यु. चव्हाण, जयश्री बनसोडे, ज्योती अग्रवाल, माया डंबाळे, पूजा डंबाळे, प्रणिमा जगताप, रूपाली डंबाळे, भारती डंबाळे आदीसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, सदर गुन्ह्याचा तपास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून आरोपीस तातडीने अटक करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!