जामखेड प्रतिनिधी ( नासीर पठाण )
ग्रामीण भागाच्या विकासासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा जास्त प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी फक्राबाद येथे ९९ लक्षाचे आरोग्य उपकेंद्र चे भूमिपूजन संपन्न झाले.
या वेळी आ. रोहित पवार यांनी बोलताना सांगितले की कर्जत – जामखेड मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात निर्माण होत असलेल्या दळणवळणाच्या सुविधांमुळे अगामी काळात मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच चौंडी – गिरवली – कवडगाव – अरणगाव – पारेवाडी – डोणगाव बावी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन अरणगाव येथे दि २५ रोजी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ०१ कोटी ३५ लाख रूपये खर्चून हा रस्ता होणार आहे. यावेळी आयोजीत कार्यक्रमात आमदार रोहित पवार बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कांबळे, शाखा अभियंता शशिकांत सुतार, बाबूराव महाडिक, शांतीलाल लाड जी.एम कन्ट्रक्शन चे राहुल पुरी, मंगेश आजबे राष्ट्रवादीचे नेते प्रा मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, फक्राबाद चे सरपंच विश्वनाथ राऊत,सह आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.