आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून केडगाव भूषण नगर चौक ते कल्याण रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
37

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून केडगाव भूषण नगर चौक ( लिंक रोड ) ते कल्याण रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर

शहराच्या विकास कामासाठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश – आमदार संग्राम जगताप

अहमदनगर प्रतिनिधी : लहू दळवी

शहर विकासासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून टप्प्याटप्प्याने निधी प्राप्त होत असल्याने त्याला यश मिळत आहे. नगर शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत असून दिवसेंदिवस नागरी वसाहती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केडगाव हे शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे, या उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी केडगाव भूषण नगर चौक ( लिंक रोड ) रस्त्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये बांधकाम विभागाच्या पुरवणी यादीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी सतरा कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

हा रस्ता दळणवळणासाठी खूपच महत्वाचा रस्ता आहे, तसेच हा मार्ग पुणे महामार्ग व कल्याण राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. याआधी या भागातील भूषणनगर चौक ते आयोध्या नगर पर्यंत साडे सात कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार कामही सुरू आहे.

याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात पुढील तीनशे मीटर साठी पाच कोटी रुपये मंजूर झाले होते.आता तिसऱ्या टप्प्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी वर्षभरात मंजूर झाला असून आता 17 कोटी रुपये निधी मंजूर झाला असा एकूण सुमारे 45 कोटी रुपये खर्च करून भूषणनगर चौक ते कल्याण रोड पर्यंतच्या संपूर्ण लिंक रोडचे काम मार्गी लागणार आहे.त्यामुळे या परिसरात नियोजनबद्ध कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागत आहे.यामुळे केडगावच्या सौंदर्यकरणात व सुशोभीकरणात भर पडेल व शहर विकासाला गती मिळेल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here