आरएमटी फिटनेसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
युवक-युवतींचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे आरएमटी फिटनेस क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवक-युवतींनी योगा करुन निरोगी आरोग्याचा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी आरएमटीचे संचालक मनिष ठुबे, सचिन कोतकर, ऋषिकेश घुले, शुभम डोळस, अभिषेक लगड, अभिजीत दीक्षित, कल्याणी बोरा, कार्तिकी लेकुरवाळे आदी उपस्थित होते.
प्राजक्ता दळवी व प्रीती बोरुडे यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर करुन विविध आसनांचे शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. या योग शिबिराला परिसरातील नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळाला. आरएमटी फिटनेसच्या वतीने आठवड्यातून दोन दिवस मोफत योगा घेण्यात येतो. तसेच आरोग्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. निरोगी आरोग्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर देखील राबविण्यात येत असल्याची माहिती मनिष ठुबे यांनी दिली.