घोटवी गावातील महाराष्ट्र शासनाच्या गायरान जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असलेल्या पारधी कुटुंबावर गावातील राजकीय गावगुंडांकडून होत असलेल्या मारहाणीचा गुन्हा दाखल असूनही आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप.
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील घोटवी गावातील पारधी समाजाचे चव्हाण कुटुंब हे महाराष्ट्र शासनाची गायरान जमिनीवर ४० ते ५० वर्षापासून शेती करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून गावातील राजकीय गावगुंड हे चव्हाण कुटुंब शेतात काम करत असताना त्यांना मारहाण करतात या मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून देखील आरोपी मोकाट फिरत आहे व आरोपींनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला व आम्हाला अटक करून कारवाई करण्यात आली मात्र आरोपींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असतानाही आरोपींना अटक केली जात नसल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना अक्षय चव्हाण, रघुनाथ चव्हाण, अजित भोसले, निलेश गायकवाड अधिक उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, गावातील राजकीय गावगुंडांनी चव्हाण कुटुंबातील महिलांना व लहान मुलांना मारहाण बबन भानुदास कदम, बाबासाहेब सदाशिव बारगजे, बापू बलभीम निभोरे, विपुल बबन कदम यांच्यासह २० ते २५ जणांनी मारहाण केलेली आहे व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून देखील कारवाई करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी २० ऑगस्ट २०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आला आहे.