आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रतीक्षा रसाळ या गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रतीक्षा रसाळ हिचा शाळेत सन्मान करण्यात आला. स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन मिश्रा यांनी रसाळ हिचा सत्कार केला.
प्रतीक्षा रसाळ ही श्रीगोंदा तालुक्यातील माजी सैनिक मच्छिंद्र रसाळ यांची कन्या असून, इयत्ता पहिली पासून तिने शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविलेला आहे. माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने देखील रसाळ हिने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.