- Advertisement -
आषाढी एकादशीला माळीवाडा बस स्थानकातून गाड्या सोडण्यात याव्यात याबाबत मनसेचे विभाग नियंत्रक यांना निवेदन
नगर – आषाढी एकादशीला माळीवाडा बस स्थानकातून बस गाड्या सोडण्यात याव्यात याबाबत मनसेचे विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर शहर सचिव डॉ.संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड ,वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरला जातात.
अनेक भाविक स्वत:च्या खासगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने जातात.
एसटी महामंडळाकडून दरवर्षी आषाढी वारीनिमित्त जादा बस सोडण्यात येतात. नगर शहरामधून तारकपूर बस स्थानक येथून पंढरपूरसाठी गाड्या सोडण्यात येतात . मात्र डी एस पी चौक ते पत्रकर चौक या रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे पोलीस अधीक्षक साहेबांनी आदेश काढून या मार्गावरील वाहतूक काही दिवसांसाठी बंद कऱण्यात आली आहे. त्यामुळे तारकपूर बस स्थानकाकडे जण्या येण्यास गैरसोय होऊ शकते त्यामुळे वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळेस माळीवाडा बस स्थानक कोणताही गावातून आले तरी त्यांना सोयीस्कर पडेल.
त्यामुळे माळीवाडा बस स्थानक येथून गाड्या सोडण्यात याव्यात. तसेच वारीकाळात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहाव्यात. गाव ते पंढरपूर एसटी सेवा अहमदनगर जिल्ह्यातून कोणत्याही तालुका/गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात यावी. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना एसटीचे ऑनलाइन आरक्षण करण्यासाठी विविध सुलभ उपाय योजना करण्यात याव्यात. आषाढी यात्रेनिमित्त विठूनामाचा जयघोष करीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आपण आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही नम्र विनंती.
- Advertisement -