इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

इंजिनियरिंगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल देण्यात आली माहिती

किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग व गवांदे मॅथ्स्‌ क्लासेसचा उपक्रम
 

अहमदनगर (प्रतिनिधी) – इंजिनिअरिंगमध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या उद्देशाने शहरात घेण्यात आलेल्या मोफत मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. किस्टोन स्कूल ऑफ इंजिनियरिंग पुणे आणि गवांदे मॅथ्स्‌ क्लासेसच्या वतीने इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेवर मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सावेडी येथील माऊली संकुल मध्ये झालेल्या या मार्गदर्शन शिबिरात इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी व त्यांना योग्य पर्याय निवडता यावा या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. प्राध्यापक तुषार शिंदे यांनी सविस्तरपणे  मार्गदर्शन करताना फेऱ्या, प्राधान्य अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, योग्य महाविद्यालय आणि शाखा निवड, कमी गुण असताना चांगले महाविद्यालय कसे मिळवावे? आणि उपलब्ध जागा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

प्राचार्य डॉक्टर संदीप कदम यांनी प्रवेश प्रक्रिया मधील बारकावे, गुणवंत शाखेची निवड, गुणवत्तेवर महाविद्यालय निवड, करिअरच्या संधी, याबाबत विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला सर्वांगीन पैलू पाडण्यासाठी सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार संग्राम जगताप यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करुन, यामुळे विद्यार्थी भरकटणार नसल्याचे स्पष्ट केले. इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या मार्गदर्शन शिबिरातून भविष्यातील योग्य वाटचाल ठरविता येणार असल्याची भावना व्यक्त करुन घेतलेल्या उपक्रमाबद्दल आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्राध्यापिका सोनाली मुरूमकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!