इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर च्या अध्यक्षपदी सौ.उज्वला भंडारी तर सेक्रेटरी पदी प्रभा खंडेलवाल यांची निवड
नगर – सामाजिक कार्यकर्ते सौ.उज्वला भंडारी या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, शालेय साहित्याचे वाटप, तसेच विविध आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून नगर शहरात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर च्या नूतन अध्यक्षपदी सौ.उज्वला भंडारी तर सेक्रेटरी पदी प्रभा खंडेलवाल यांची निवड पूर्वअध्यक्ष लक्ष्मी काळे व सर्व सभासदांच्या सहमतीने करण्यात आली आहे. इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर चा पदग्रहण समारोह थोड्याच दिवसात संपन्न होणार आहे.
सौ.उज्वला भंडारी म्हणाल्या, इनरव्हिल क्लबच्या सर्व सदस्यांनी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. तो मी सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. तसेच समाजातील दीनदुबळ्या घटकांची सेवा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील असे सांगितले.