आष्टी प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील भगवदगीता सेवाभावी संस्था,सुरूडी संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर सुरूडी या शाळेतील विद्यार्थी घवघवीत यश मिळून उत्तीर्ण झाले आहेत.
एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर सुरूडी या शाळेचे एकूण १९ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले, त्यापैकी १३ विद्यार्थी पास झाले.त्यामधील १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.सदर विद्यार्थ्याना प्रतिवर्षी बारा हजार (१२०००) रुपया प्रमाणे चार वर्षासाठी अठ्ठेचाळीस हजार (४८०००) रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यामध्ये कु.गर्जे तृप्ती विठ्ठल, कु.गर्जे प्रतिभा माणिक, कु.राऊत निता अंबादास, कु.गर्जे प्रियंका ज्ञानदेव, कु.गर्जे पूजा लक्ष्मण, कु.वणवे प्रतिक्षा गोरक्ष, कु.दराडे सिमा एकनाथ, कु.सांगळे वर्षा आजिनाथ, कु.गर्जे वैष्णवी नागनाथ, कु.रोकडे निकीता शहादेव हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.
या परीक्षेसाठी विद्यार्थाना गहिनीनाथ गर्जे सर,संभाजी गर्जे सर,विनोद पवार सर,परमेश्वर कर्डिले सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भगवदगीता सेवाभावी संस्था सुरूडी अध्यक्ष,सचिव व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शहादेव गर्जे सर,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,पालक शिक्षक संघ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.