एमआयडीसीतील आयकॉन मोल्डर्सच्या कामगारांना पगारवाढ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

एमआयडीसीतील आयकॉन मोल्डर्सच्या कामगारांना पगारवाढ

अखिल भारतीय कामगार सेना व आयकॉन मोल्डर्समध्ये करार संपन्न

बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, पगारी रजा व सुट्ट्यांचा कामगारांना मिळणार लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय कामगार सेना व एमआयडीसी येथील आयकॉन मोल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात नुकताच करार होऊन, कर्मचाऱ्यांना 7 हजार रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्याचबरोबर कामगारांना बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, पगारी रजा व सुट्ट्या व कामगार कायद्याप्रमाणे इतर लाभ नवीन करारानुसार मिळणार आहे. हा करार 1 एप्रिल 2024 पासून ते 31 मार्च 2027 पर्यंत तीन वर्षासाठी करण्यात आला आहे.

15 ते 16 वर्षापासून करार न झाल्याने मागील काही वर्षापासून अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरु होता. अखिल भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राजेश पाटील व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापनासह बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या कराराने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वेतनवाढीच्या करारावर कामगार युनियनच्या वतीने राजेश पाटील, भाऊसाहेब उनवणे, कामगार प्रतिनिधी आनंद बारस्कर, नितीन उजागरे, युनिट अध्यक्ष एडके ताई यांचे तर कंपनी व्यवस्थापनातर्फे संचालक बिजल शेठ यांनी सह्या केल्या. यावेळी कामगार संदीप निमसे, नितीन उजागरे, आनंद बारस्कर, अशोक सबीन, संजय नरसाळे, मयूर बारस्कर, शिवाजी दरेकर आदी उपस्थित होते.

कंपनीचे बिजल शेठ यांनी कंपनीतील कामगारांना भरीव पगारवाढ देण्यात आली आहे. तसेच कामगार कायद्यांचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना दि.1 एप्रिल 2023 पासून फरकाची रक्कम देखील लवकरच अदा केली जाणार असून, युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे अत्यंत सौजन्याचे नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाऊसाहेब उनवणे म्हणाले की, कंपनीतील कामगारांना महागाईच्या काळात सन्मानाने जगता यावे, यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा करुन त्यांचा वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लावण्यात आला आहे. यासाठी संघर्षाची वेळ न येता, कंपनीकडूनही मोठे सहकार्य मिळाले. या करारामुळे कामगार व कंपनीचे आनखी चांगले भावनिक नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. युनिट अध्यक्षा एडके ताई यांनी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना पगारवाढ शक्य झाली असून, युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!