एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड २०२४ वितरण सोहळा संपन्न
एसा सभासदांच्या कल्पक्तेनुसार नगर शहर महानगराकडे वाटचाल करेल – आयुक्त डॉ पंकज जावळे
नगर : शहर बहुमजली इमारतीच्या माध्यमातून नावारूपाला येत असून विविध प्रकारची चांगली बांधकामे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात एसा सभासदांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यकरणात भर पडत असते, सर्वांच्या सहकार्यातून शहर विकासाला गती प्राप्त झाली आहे, शहरातील विविध भागात रस्त्यांची कामे हाती घेतली आहे, सभासदांच्या कल्पक्तेनुसार नगर शहर महानगराकडे वाटचाल करेल, एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्डच्या माध्यमातून आर्किटेक्ट्स इंजिनियर यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी एसा असोसिएशनने बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड जाहीर करून हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केले.
एसा बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड २०२४ पोवरड बाय पोलाद स्टील जालना पुरस्कारांचे दिमाखदार सोहळ्यात वितरण कार्नाय्त आले, यावेळी प्रमुख अतिथी महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे, राजदीप बिल्डकॉनचे संचालक राजेश कटारिया, पोलाद स्टील कंपनीचे प्रेसिडेंट जयेश मेहता आणि व्हाइस प्रेसिडेंट आशिष भाबडा, अध्यक्ष रमेश कार्ले, उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, खजिनदार वैभव फिरोदिया, प्रथमेश सोनावणे, सुनिल औटी, विनोद काकडे, प्रितेश पाटोळे, मयुरेश देशमुख, उदय तरवडे, संकेत पादिर, यश शहा, इक्बाल सय्यद, मिनल काळे, एस यू खान, अजित माने, अनिल साळुंके, प्रल्हाद जोशी, रमेश छाजेड, देवेंद्रसिंग वधवा तसेच सभासद आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे १) रेसिडेन्सीअल कॅटेगरी बंगलो बिलो २०० चौ मी. कांचन बंगला आर्की. दीपक माने व टीम. २) रेसिडेन्सीअल कॅटेगरी बंगलो अबाउ २०० चौ मी. फ्रेमिंग द स्टोन – अजय दगडे व आर्की तुषार भामरे टीम. ३) रेसिडेन्सीअल कॅटेगरी ट्विन व रो हाऊस ग्रूप हाउसिंग – श्री. दत्त नगर हाउसिंग स्कीम मकरंद देशपांडे व टीम. ४) रेसिडेन्सीअल कॅटेगरी ग्रूप हाउसिंग अपार्टमेंट – साई आनंद रेसिडेन्सी आर्की प्रितेश गुगळे व टीम. ५) कमर्शिअल कॅटेगरी – फन इन डोअर अमुजमेन्ट पार्क आर्की. मयुरेश देशमुख व टीम ६) सोशियल कॅटेगरी – वरद नेत्रालय आर्की. वैभव देशमुख व टीम ७) इण्डस्ट्रीयल कॅटेगरी & इंडिया क्यू ओ फुडस प्रा लि सुपा इंजि. सुभाष दहातोंडे उल्का प्रोजेक्ट्स प्रा लि व टीम. ८) ओपन कॅटेगरी – रामायण वाटिका आर्की. मयुरेश देशमुख व टीम ९) आऊट साईड नगर कॅटेगरी – मेहेर ब्लिस आर्की. प्रितेश गुगळे व टीम १०) आऊट साईड नगर कॅटेगरी अपार्टमेंट ॲट वाघोली सुनिल औटी व टीम. ११) आऊट साईड नगर कॅटेगरी – विखे फॉर्म हाऊस संजय कटारिया, प्रेरणा कटारिया व टीम.
अहमदनगर शहर व महापालिका हद्दीत संस्थेच्या काम केलेल्या सभासदांनी त्यांचे प्रोजेक्ट या स्पर्धेत दाखल करून सहभाग नोंदवला होता. एकूण आठ कॅटेगरी मध्ये ५३ एंट्री दाखल केल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षक पदाचे काम आर्की. अरुण काब्रे, आर सी सी डिझाइनर मिलिंद राठी, पी एम सी कन्सल्टंट अजित टिपरे यांनी काम पाहिले. सर्व प्रोजेक्ट चे प्रेझेंटेशन तसेच पी पी टी अथवा व्हिडिओ शूटिंग यासाठी सहभागी सभासदांनी दिले होते. आवश्यक कामांची त्यांनी साईट व्हीजीट केली, आणि विजेते जाहीर केले.
राजदीप बिल्डकॉनचे राजेश कटारिया यांनी सर्व विजेते आणि सहभागी सभासदांचे अभिनंदन करून संस्थेने आयोजित केलेल्या अश्या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा सभासदांमध्ये घडत असल्याचे सांगितले, यावेळी पोलाद स्टील कंपनीने सभासदांच्या मुलांसाठी तारांगण दाखवण्याची व्यवस्था केली होती, तसेच फॅमिली फोटो साठी सेल्फी पॉइंटची व्यवस्था करण्यात आली होती. संस्थेचे सभासद अजय दगडे यांनी हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले तर समन्वयक अन्वर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.