औद्योगिकीकरणाला चालना मिळाल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटणार – खासदार लंके
एमआयडीसीच्या उद्योजकांची भेट घेऊन विकासासाठी खासदार लंके यांची भावनिक साद
आमी संघटनेच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकीय लोक नेहमी भाषण देतात, पण प्रत्यक्षात काम काही करत नाही. मात्र मी काम करणारा खासदार आहे. मी वेळ वाया घालवत नाही लोकांचे प्रश्न मार्गी लावतो. नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करुन जेंव्हा बदल घडवून आणले तेंव्हाच मी सत्कारास पात्र ठरणार असल्याची भावनिक साद नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी एमआयडीसीच्या उद्योजकांना घातली.
अहमदनगरच्या एमआयडीसीत खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. आमी संघटनेच्या वतीने खासदार लंके यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक योगिराज गाडे, संजय गारुडकर, संदेश कार्ले, दत्ता जाधव, आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र शुक्रे, रोहन गांधी, सचिन पाठक, सुमित सोनवणे, सतीश गवळी, सुनील कानवडे, समीर पटवर्धन, विलास तनपुरे, चिन्मय सुकटणकर, संतोष शिंदे, सागर निंबाळकर, प्रफुल्ल पारख, सुभाष गुगळे, विश्वनाथ पोंधे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे खासदार लंके म्हणाले की, पद प्रतिष्ठा ही फक्त मिरवण्यासाठी नसते. सर्व उद्योजकांना सोबत घेऊन नगरच्या एमआयडीसीचा विकास केला जाणार आहे. उद्योजक टिकला, तर बेरोजगारी कमी होणार आहे. नगर दक्षिण मतदार संघात खुप फिरलो अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. पण सर्वात गंभीर प्रश्न सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचा आहे. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर औद्योगिकीकरणाला चालना दिली पाहिजे. एमआयडीसीत लाईट, रस्ता, भूखंडाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीत मोठ-मोठ्या कंपन्या आल्या पाहिजे. त्यामुळे लघु उद्योजकांना चालना मिळून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या मागून आलेले सुपा, रांजणगाव, वाळूंज या एमआयडीसी सुधारल्या. आमी संघटना ही उद्योजकांच्या पाठिशी असल्याचे स्पष्ट करुन आमी संघटनेची ओळख करून दिली. तर संघटनेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचा आढावा घेतला व एमआयडीसीत उद्योजकांना येणाऱ्या अडी-अडचणी आणि विविध प्रश्न मांडले. आमी संघटनेच्या वतीने खासदार लंके यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाठक यांनी केले. प्रास्ताविक संजय संजय बंदिष्टी यांनी केले. आभार अमोल घोलप यांनी मानले.