नेवासा फाटा,प्रतिनिधी – काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या नेवासा फाट्यावरील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
औरंगाबादहून नगरला जाताना ना.थोरात यांनी शुक्रवारी नेवासा तालुक्याला धावती भेट दिली. ना.थोरात यांचे नेवासा फाट्यावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे त्यांनी यावेळी फीत कापून उदघाटन केले.
यावेळी आमदार लहू कानडे तसेच एस.सी. विभागाचे राज्य समन्वयक शिवाजी जगताप, बंटीभाऊ यादव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, सरचिटणीस सुदाम कदम, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्ञानदेव वाफारे, अंकुश कानडे, नेवासा शहर अध्यक्ष रंजन जाधव,बंटी जाधव,आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुशील धायजे, घटनापती प्रतिष्ठानचे रवी भालेराव, भीमशक्तीचे तालुका अध्यक्ष पप्पू कांबळे, पत्रकार श्रीनिवास रक्ताटे ,माऊली सिन्नरकर ,चंद्रकांत दरंदले ,बबलू साळवे, आकाश साळवे, आदेश कांबळे, ऋषिकेश जपे, अमित शिरसागर, बंटी साळवे, आनंद साळवे, वक्रतुंड इंगळे, सौरभ गायकवाड,आदी मान्यवर उपस्थित होते.
गायकवाड यांचे एस.सी. विभागाच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या कार्याचे ना.थोरात यांनी कौतुक करून त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे यांनी केले. काँग्रेसचे तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले तर रवी भालेराव यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले. पोलीस कॉन्स्टेबल किरण गायकवाड,गणेश गलदर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गुंठेवारी सुरू ठेवा – भालेराव
सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरलेली गुंठेवारीचे व्यवहार शासनाने नुकताच आदेश काढून बंद केल्यामुळे गोरगरीबांची मोठी कुचंबना होत आहे. या विषयी घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी भालेराव यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले आणि गुंठेवारीचे व्यवहार परत सुरळीत चालू करण्याचे आदेश काढण्याची मागणी त्यांनी यावेळी ना.थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.