कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
आजादी का अमृत महोत्सव व महात्मा गांधी यांची जयंती यानिमित्ताने कर्जत मध्ये न्यायाधीश,वकील व विधी सेवा समिती यांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.
कर्जत मध्ये आज शनिवारी विधी सेवा समिती यांच्यावतीने,आजादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने कर्जत शहरांमधून जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये येथील न्यायाधीश एम एम पळसापुरे, डी एम गिरी, वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट धनंजय रानमाळ, उपाध्यक्ष सचिन रेणूकर, सचिव संजीवन गायकवाड, ज्येष्ठ वकील उत्तमराव नेवसे, दीपक भंडारी,श्री रसाळ,श्री मोगल यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.
विधी सेवा समिती यांच्या वतीने आज कर्जत मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये दुचाकी वरून रॅली काढून नागरिकांना कायदेविषयक जनजागृती करण्यात आली.तसेच कर्जत बस स्थानक परिसरामध्ये न्यायाधीशाच्या हस्ते कायद्याची माहिती देणारी पत्रके प्रवाशांना वाटप करण्यात आली.
यावेळी बोलताना न्यायाधीश एम एम पळसापुरे म्हणाले की,आजादी चा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे त्याच प्रमाणे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती यानिमित्ताने विधी सेवा समिती यांच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे,आज पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून १४ नोव्हेंबर या दिवशी ही मोहीम संपणार आहे, तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन याबाबत माहिती देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन न्यायाधीश श्री पळसापुरे यांनी केले.
यावेळी बोलताना न्यायाधीश डी एम गिरी यांनी सांगितले की,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विधी सेवा समिती यांच्या मार्फत कर्जत तालुक्यामध्ये आज पासून कायदेविषयक जनजागृती मोहीम सुरू केली आहे.येथील बस स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांना कायदा त्याची माहिती दिली आहे.याबाबत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जनजागृती पुढील काळामध्ये करण्यात येणार आहे.
यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट धनंजय राने बोलताना म्हणाले की,विधी सेवा समिती तसेच वकील संघटनेचे सर्व सदस्य यांच्यावतीने कायदेविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली आहे,असेच विविध कार्यक्रम तालुक्यामध्ये संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहेत.