कवडे नगर पंचशील हाउसिंग सोसायटी मधील पाणी प्रश्न गंभीर
आयुक्तांना प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकांचे निवेदन
नगर : कवडे नगर पंचशील हाउसिंग सोसायटी या भागांमध्येअनेक दिवसापासून पाणी प्रश्न विस्कळीत झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते वारंवार महापालिकेकडे तक्रारी करून देखील पाणी प्रश्न मार्गी लागला नाही. याचबरोबर पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यानंतर नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी साचले जाते. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असते तरी पावसाळ्यापूर्वी साईट गटारीचे काम मार्गी लावावे.
कॉलनीमध्ये साफसफाई चे काम होत नसून ४ ते ५ दिवस घंटागाडी कचरा घेऊन जाण्यासाठी येत नाही त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या प्रश्नांकडे आयुक्ताने लक्ष घालून नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे अशी मागणी मा.उपमहापौर मालन ताई ढोणे व मा.नगरसेवक प्रदीप परदेशी यांनी केली यावेळी अजय ढोणे सह कमलेश सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -