नेवासा (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी कमलेश मोगल गायकवाड यांची राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून विभागाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश महासचिव बंटी यादव यांनी गायकवाड यांची नुकतीच पुनर्नियुक्ती केली आहे.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष म्हणून गायकवाड यांनी समर्थपणे जबाबदारी पेलली आहे. त्यांच्या कार्यकाळात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांनी पक्षाच्या माध्यमातून भरीव तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याने जिल्ह्यातील दोन्ही जागा भाजप – सेनेच्या ताब्यातून काढून घेण्यास मोठी मदत झाली आहे. पक्ष तसेच नेतृत्वाचे विचार आणि कार्य जिल्ह्याच्या तळागाळात प्रभाविपणे पोहचविण्यात गायकवाड यांनी मोलाची भूमिका बजावल्याने संतुष्ट पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कामाची विशेष दखल घेऊन त्यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याच्या पार्शवभूमीवर त्यांना अधिक बळ देण्याची भूमिका घेतली आहे.
दि ११ सप्टेंबर रोजी संगमनेर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीत या निवडीचे पत्र काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष पुनर्नियुक्तीचे पत्र देण्यात आले. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष बंटी यादव यांनी गायकवाड यांची नियुक्ती जाहीर केली.
यावेळी बोलताना आमदार थोरात यांनी गायकवाड यांच्यावर पक्षाने वेळोवेळी टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून त्यांनी राज्यात सूक्ष्म नियोजन करून पक्ष वाढीसाठी मोठी कामगीरी केली असल्यामुळे हि निवड करण्यात आली असल्याचे गौरवोदगार काढले.
गायकवाड यांच्या या निवडीबद्दल माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, जयश्रीताई थोरात, आमदार सत्यजित तांबे, आमदार शंकरराव गडाख, आमदार लहू कानडे, आदी मान्यवरांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.