कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न
कामगार हा औद्योगिक क्षेत्राचा कणा – आमदार संग्राम जगताप
नगर : कंपनी प्रशासक आणि कामगार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम अहमदनगर जिल्हा कामगार संघटना करत असून कामगारांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावले जात आहे, कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा करत प्रश्न मार्गी लावावे लागतात, एखादा प्रश्न सुटत नसेल तर लढा उभा करावा लागतो, संतोष लांडे हे कामगारांचे प्रश्न समजावून घेऊन सोडवण्याचे काम करत आहे कामगारांनी देखील कंपनीच्या उज्वल भविष्यासाठी चांगले काम उभे करावे, गुणवत्ता व उत्पादन वाढीसाठी कामगारांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, शासनाच्या कामगार कायद्याचे पालन कंपनी प्रशासनाने करावे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी येथे अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा माणिकराव विधाते, राष्ट्रवादी युवा नेते मयूर बांगरे, किरण दाभाडे, निलेश हिंगे, किरण गुंजाळ, संतोष भिंगारदिवे, जुबेर शेख, रवींद्र वाकळे, योगेश राऊत, अभिजित भिंगारदिवे, आकाश शिंदे, हर्षल शिरसाठ, नितीन निंभोरे, संग्राम केदार, अजय ठाणगे, दीपक आंग्रे, गुलाब गायकवाड, दादा गायकवाड, भारत पवार, दिनेश शेळके, नितीन जाधव, स्वप्नील बोरडे, अक्षय पवार, करण वाघमारे, भारत लोखंडे, नयन साळवे, सागर धीवर, निशांत पाखरे, धीरज गुजर, योगेश थोरात आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील प्रश्न मार्गी लावले जात आहे असे ते म्हणाले
कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले की, कंपनी प्रशासन व कामगार यांच्यामध्ये आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असतो कंपनीला कुठेही वेठीस धरून कामगारांचे प्रश्न सोडवले जात नाही तर एकमताने प्रश्न सोडविले जात आहे कामगारांनी देखील कंपनीच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करावे त्या माध्यमातून कंपनीचे उज्वल भविष्य निर्माण होईल व कामगारांना न्याय मिळेल कामगारांचे नगर शहरामध्ये स्वतःच्या हक्काचे घर व्हावे, तसेच विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा कामगार संघटना काम करत असते, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कामगार हिताचे निर्णय मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे कायनेटिक कंपनीमध्ये संघटनेची शाखा स्थापन झाली असून कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.