अहमदनगर प्रतिनिधी -अमोल भांबरकर
“केअर फोर यू” संस्थेचा १० वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.”केअर फोर यू” संस्था गेल्या दहा वर्षापासून अनाथ,वंचित मुलं,वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी सामाजिक कार्य करत आहे.
वंचित मुलांना इमॅजिका पुणे, वॉटर गेम्स शिर्डी,मुंबई सारख्या ठिकाणी सहलीला घेऊन जाणे,नृत्य स्पर्धा आणि गायन स्पर्धा यांचं अतिशय मोठ्या प्रमाणावर आयोजन करून या मुलातील कलागुणांना प्रोत्साहन देणे, वृद्धाश्रमातील नागरिकांना पंढरपूर,अष्टविनायक इत्यादी धार्मिक ठिकाणी सहलीला घेऊन जाणे,विविध सणांना वृद्धाश्रमात आणि मुलांच्या संस्थेत जाऊन त्यांच्यासोबत सण साजरे करणे.यासारखे विविध उपक्रम वर्षभर सातत्याने राबवले जातात.
“केअर फोर यू” च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे,नाशिक, अहमदनगर,सातारा,बेळगाव, इंदोर इत्यादी दहा शहरांत,विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्त अहमदनगर येथील विळद घाटातील मातोश्री वृद्धाश्रमात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी सौ.स्मिता घैसास, सौ.प्रमिला सहदेव आणि स्नेहालया च्या साक्षी,दिव्या यांनी अतिशय सुरेल भजने सादर केली.वृद्धाश्रमातील नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला.
वृद्धाश्रमातील नागरिकांना खाऊ,सुकामेवा,कॅल्शियम, विटामिनच्या गोळ्यां इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमातील नागरिकांनी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आनंद व्यक्त केला आणि लवकरच पंढरपूरला सहल काढण्याची मागणी केली.
याप्रसंगी कलावती देडगावकर,”केअर फोर यू” संस्थेचे स्मिता सारडा,वसुधा कुकडे,अलका नावंदर,कैवल्य कुलकर्णी,सी.ए.उमेश दोडेजा, नेहा देडगावकर जग्गी,प्रियंका बठेचा हिरानंदानी,मेहर नगरवाला,चोपडा आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
समाजातील दानशूर व्यक्तींचा संस्थेच्या कार्यावर विश्वास आणि कायम पाठिंबा याच्या बळावरच संस्थेने एवढी मोठी वाटचाल केली असल्याची भावना “केअर फोर यु” च्या संस्थापिका पायल सारडा-राठी यांनी यावेळी व्यक्त केली.