अहमदनगर प्रतिनिधी- मनपा आरोग्य समितीच्या वतीने जुन्या महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नागरिकांच्या विविध आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा होऊन सदस्यांनी सांगितले की, शहरांमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून साथीच्या आजारांचा फैलाव सुरू झाला आहे.त्यामुळे अनेक नागरिक आजाराने त्रस्त झाले आहे. शहरांमध्ये सध्या 22 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.यासाठी संपूर्ण शहरांमध्ये औषध फवारणी करावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवावे,डेंग्यूसदृश आजाराची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तपासणी करून घ्यावी,डासाची उत्पत्ती झालीच नाही पाहिजे व तो चावला नाही पाहिजे याची काळजी नागरिकांनी घ्यावी यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे.डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात तयार होतो यासाठी आपल्या घराजवळ पाणी साचू न देणे, कुंड्यांमधील पाणी काढून टाकणे तसेच साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडण्यात यावे व नागरिकांनी उकळून दररोज पाणी प्यावे व डेंग्यूसदृश आजाराच्या लक्षणाची नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने मनपा आरोग्य विभागाकडे करताना समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे,निखिल वारे,सदस्य सचिन जाधव,सदस्य सतीष शिंदे यांनी केली. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश राजूरकर व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य सरकारने लॉकडाऊन हटवून सर्व व्यवहार सुरळीत केले आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना कराव्यात याच बरोबर कोरोनाच्या तपासण्या वाढवाव्यात तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीची तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवावे तसेच लसीकरण वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात जेणेकरून नगर शहर हे कोरोना मिशन ‘झिरो’ होण्यास मदत होईल.