अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
मार्केट यार्ड जवळील पुनम मोतीनगर येथे राहणार्या पहिली-दुसरी इयत्तेमधील मुलांनी ‘क्रांती’ किल्ला तयार केला.अत्यंत सुंदर,आकर्षक तयार केलेल्या या किल्ल्याचे परिसरातील नागरिकांनी मुलांच्या कला-गुणांचे कौतुक केले. यामध्ये कविश चोरडिया, रिधांश मुथा,साई जगताप, विहान चोरडिया,अवनी पालवे आदि चिमुकल्यांनी सहभाग घेऊन हा क्रांती किल्ला बनविला आहे.
दिवाळी सुट्टीत लहान मुलांनी किल्ले तयार करण्याचे वेध लागतात.काही ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात, मुलांना बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पालकांसह परिसरातील नागरिक करीत असतात.पुनममोतीनगर मध्ये तयार करण्यात आलेल्या क्रांती किल्ला पाहण्यासाठी गर्दी करुन कौतुक करत आहेत.
सध्या तरुणपिढी मोबाईलमुळे वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहे.प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे लहान मुले टीव्ही चॅनलवरील छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक मालिका पाहतांना इतिहासाचे ज्ञान वाढते.यामधूनच मुलांना किल्ला तयार करण्याची प्रेरणा मिळाली अशी माहिती प्रशांत मेहेर यांनी दिली.