गवांदे क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
गवांदे क्लासेसच्या रूपाने राज्यात गुणवंत यादीत विद्यार्थी येण्याचे काम होत आहे – आ. संग्राम जगताप
नगर : तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झाल्या असून करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहे यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे, या माध्यमातून आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण होत असते विद्यार्थी हा उज्वल भारताचे भवितव्य असून एक जबाबदार नागरिक घडत असतो, स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. गवांदे क्लासेसच्या माध्यमातून शहरात गुणवंत विद्यार्थी घडत असून या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल, गवांदे क्लासेसच्या रूपाने राज्यात गुणवंत यादीत विद्यार्थी येण्याचे काम होत असून शिक्षण क्षेत्रामध्ये नगर शहराला नावलौकिक मिळत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
माऊली सभागृह येथे गवांदे क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी आमदार संग्राम जगताप, प्रा. डॉ. उल्हास माळवदे, प्रा. तुषार शिंदे, इतिहास संशोधक नवनाथ वाव्हळ, सचिन जगताप, यु पी एस सी विद्यार्थी सिद्धार्थ तागड, प्रा. प्रभाकर गवांदे, छायाताई गवांदे, विवेक चौधरी, प्रमोद ढगे,सुरेश जावळे, व्यवस्थापक युवराज महांडोळे आदीसह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. उल्हास माळवदे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे, गवांदे क्लासेसच्या माध्यमातून वर्षभर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून नगरमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना आता महानगराकडे जाण्याची गरज नाही, गवांदे क्लासेसच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी व डिग्रीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली जाते. तसेच या माध्यमातून आपला पाल्य घडत असल्याचे समाधान पालकांना मिळत असून त्यांचा विश्वास संपादन केला जातो, तसेच गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केल्याने त्यांना पुढील वाटचालीस उर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळते असे ते म्हणाले.
गवांदे क्लासचे संचालक प्रभाकर गवांदे म्हणाले की, बदलत्या शैक्षणिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना तज्ञ व्यक्तीचे सुयोग्य मार्गदर्शन मिळविणे गरजेचे असते. अशा मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध करियर विषयी माहिती मिळते. या परिसंवादाचा उपयोग व पूर्वतयारीसाठी होतो. गवांदे क्लासेस शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जिल्ह्यामध्ये ओळखले जाते. या क्लासला आय एस ओ-९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. गावंदे क्लासेसमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी यांसारख्या परीक्षेसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची ,पात्रता, अभ्यासक्रम, ही रचना, अर्ज कसा करावा. प्रवेश प्रक्रिया संबंधीचे वेळापत्रक, संकेतस्थळ, प्रवेश क्षमता व जागांचे वितरण या संदर्भात सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतात. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना इंजीनियरिंग, मेडिकलला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठीच ही सर्व धडपड आहे. म्हणूनच हा परिसंवाद विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आला होता. उल्हास माळवदे हे गेल्या वीस वर्षापासून संपूर्ण भारतात विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करतात. असे ते म्हणाले.
चौकट : यूपीएससी विद्यार्थी सिद्धार्थ तागड यांचा आदर्श प्रेरणादायी
स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससीमध्ये अनेक विद्यार्थी करिअर करत असतात काही विद्यार्थी दिल्ली, पुणे येथे क्लास लावून अभ्यास करीत असतात व आपले ध्येय गाठत असतात मात्र सिद्धार्थ तागड या विद्यार्थ्याने यूपीएससी परीक्षेमध्ये कुठेही क्लास न लावता आपल्या घरातच यूपीएससीचा अभ्यास केला आणि पास देखील झाला त्याचे ध्येय, जिद्द, चिकाटी, मेहनत ही विद्यार्थ्यांना आदर्श असून प्रेरणा देणारी असल्याचे मत आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले
- Advertisement -