अहमदनगर (प्रतिनिधी)- बोरगाव माळशिरस जि.सोलापूर येथे मातंग समाजाच्या मयत व्यक्तिला स्मशान भूमित जाळण्यास विरोध करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच त्यांची साथ देणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी व चंद्रपूर जिल्ह्यातील वणी या गावात दलित समाजातील महिला वयोवृद्धांना जादूटोणा करण्याच्या कारणावरून हातपाय बांधून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करुन घटनेचा निषेध दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शन करून करण्यात आला यावेळी दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलीम सय्यद, सुरेंद्रसिंग घारू, चंद्रकांत सकट, चंद्रकांत चव्हाण, रफिक शेख, दत्ता शेलार, विशाल भालेराव, अरुणाताई कांबळे, नानाभाऊ कांबळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांचे बंधू धनाजी साठे यांचे निधन झाले असता गावातील काही जातीवादी गुंड प्रवृत्ती समाजकंटकांनी त्यांचा अंत्यविधी स्मशान भूमित करू दिला नाही त्यामुळे मयताची विटंबना करून माणुसकीला काळीमा फासणारी अतिशय निंदनीय घटना घडली या सर्व घटनेला सर्वस्वी पोलिस जबाबदार आहेत गावातील समाजकंटकांनी ज्यावेळी मयत समशान भूमित नेण्यास विरोध केला त्या वेळी पोलिसांनी ही त्यांची गाडी रस्त्यावर उभी करून प्रेत अडवून विटंबना केली आहे.त्यामुळे पोलिसांवर देखील ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पोलिसांनी मध्यस्थी करून प्रेत डवले नसते व पोलीसानी आरोपीवर कारवाई केली असती तर अशी घटना घडलीच नसती परंतु पोलिस हे गावगुंडांची आणि राजकारणाचे ताटाखालचे मांजर बनून त्यांना सोडून गरीब दलित यांवरच अन्याय करतात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे होऊनही पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर अन्याय होण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाही, दशरथ साठे आरक्षणा मधून निवडून येऊन सरपंच झाले त्याचा राग मनात धरून गावातील गावगुंड राहून कुदळे व विनायक कुदळे यांनी सरपंचाला शेतात जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेले असता बेदम मारहाण केली त्यानंतर दशरथ साठे यांनी पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता परंतु पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही त्यामुळे त्या आरोपींचे मनोधैर्य वाढले त्यामुळे त्यांनी पुन्हा जाऊन त्यांच्यावर मारहाण केली व त्यांच्या भावाचे अंत्यविधी करण्यास गावातील या समाजकंटकांनी विरोध केला आमच्यावर दाखल केलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या अन्यथा या गावात मयतावर अंत्यविधी करू देणार नाही त्यावेळी पोलिस तेथे उपस्थित असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई न करता उलट मयताची गाडी अडवून धरली व पोलिसांनीही मयताची विटंबना केली त्यानंतर दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचा अंत्यविधी केला तसेच धनाजी साठे यांचा मृत्यू ही या गावगुंडांचा दहशतीमुळे झाला आहे त्यामुळे त्या गावगुंड वर खुनाचा गुन्हा दाखल करून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी तसेच साठे कुटुंबाला संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे व पोलिसांवर आरोपीला मदत केली व मयताची विटंबना केली म्हणून पोलिसांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वणी या गावात जादूटोणा केल्याचा संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला वयोवृद्धांना हातपाय बांधून चौकात अमानुषपणे मारहाण करण्यात आली या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले आहेत अत्यंत लाजिरवाणी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे या घटनेचा दलित महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करून आरोपींवर त्वरित कारवाई करून आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.