चिंचेवाडीत वायभासे परिवाराचे पंकजा मुंडेकडून सांत्वन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

कार्यकर्त्यांनो मला तुमचा असा अंत नका दाखवू

चिंचेवाडीत वायभासे परिवाराचे पंकजा मुंडेकडून सांत्वन

नगर – आपल्या सर्वांचे दैवत जेव्हा आपणाला सोडून गेले तेव्हा मला दु:ख अनावर झाले होते. वडिल गोपीनाथ मुंडे गेले, तेव्हा मी हतबल झाले होते, पण सर्व कार्यकर्त्यांनी मला धीर, आधार, प्रेम दिल्याने न खचता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय, सामाजिक प्रवास सुरुच ठेवला. निवडणुकीत हार-जीत सुरुच राहते. एका पराभवाने खचून जाऊ नका, कार्यकर्त्यांनो मला तुमचाच आधार आहे. ‘मला समर्थन देता ना मग असा अंत मला दाखवू नका’, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिली.

चिंचेवाडी (ता.आष्टी) येथील कार्यकर्ते पोपटराव वायभासे यांनी पंकजाताईंचा पराभव सहन न झाल्याने जीवनयात्रा संपविली. या कुटूंबाचे सांत्वन पंकजाताईंनी घरी जाऊन केले. यावेळी माजी आ.भिमराव धोंडे, सुरेश अण्णा धस, भिमराज आव्हाड, मृत्यूंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल सांगळे, किरण लटपटे, संकेत रोकडे, उमेश गांगुर्डा, जितू पाटील, अमर भोसले, आनंद नाकाडे, प्रताप भिंगारदिवे, स्वप्निल वाकचौरे,चिंचेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

स्व.पोपटरावर वायभासे यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या सर्वांचे सांत्वन पंकजा मुंडे यांनी केले. कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणारनाही. माझ्या प्रेमापोटी तुम्ही जीव देऊ नका. तुमचा अंत असा पाहवत नाही, असे म्हणून अश्रुंचा बांध फुटला. उपस्थित सर्वांनाच आश्रु अनावर झाले. कुटूंबियांना मदत देण्याचे यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!