चॅम्पियन्स् रनर्स अकादमीतर्फे धावपटू जगदीप मकर यांचा सन्मान
नगर – दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकतच्या झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत धावपटू जगदीप मकर यांनी दुसर्यांदा सहभाग नोंदवून ‘बॅक टू बॅक’ पदक मिळविल्याबद्दल वाडिया पार्क येथील चॅम्पियन्स रनर्स अकादमीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अकदामीचे प्रशिक्षक सनी साळवे, टॉपर्स क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक आविनाश काळे, यूथ फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक मनिषकुमार सिंग, मल्लखांब अकादमीचे प्रशिक्षक राम गोंदालकर, लेप्ट.कर्नल संजेश भवनानी आदिंसह खेळाडू उपस्थित होते.
यावेळी सनी साळवे म्हणाले, धावपटू जगदीप मकर यांनी जागतिक दर्जाची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करुन नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कठिण अशा या स्पर्धेत सलग दुसर्यांदा यश मिळविणे मोठे कठिण काम केले आहे. त्यांच्या यशाने नगरच्या खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
अविनाश काळे म्हणाले, नगरमध्येही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, त्यांना प्रोत्साहन दिल्यास तेही मोठे यश संपादन करु शकतात हे जगदीप मकर यांच्यासह योगेश खरपुडे, गौतम जायभाय, रवी पत्रे यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे यश नगरमधील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
सन्मानास उत्तर देतांना जगदीप मकर म्हणाले, अहमदनगर रनर्स क्लब, अहमदनगर सायकलिंग क्लब, नगर रायझिंग फौंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील ही अतिशय कठिण अशा स्पर्धेत जागतिक दर्जाचे खेळाडू सहभागी झाले होते. परंतु जिद्द, चिकाटीच्या जोरावर आम्ही यश मिळाविले. नगरकरांच्या सदिच्छा आमच्या पाठिशी होत्याच. आजच्या सन्मानाने आम्हाला पुढील स्पर्धेसाठी प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
- Advertisement -