जय युवा अकॅडमीच्या वतीने चिचोंडी पाटीलला वनौषधी रोपांची लागवड;पथनाट्यातून मतदार जागृती

- Advertisement -

लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती होऊन बदल घडू शकतो – अशोक सोनवणे

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

लोककलेच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती होऊन बदल घडू शकतो. लोककला हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम असून, ऐतिहासिक काळापासून लोककला प्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या असल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार अशोक सोनवणे यांनी व्यक्त केली.

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणूक विभाग, नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीच्या वतीने आयोजित मतदार जागृती अभियान व वनौषधी रोप लागवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सोनवणे बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, अमोल बागुल, धीरज ससाणे, उडान फाऊंडेशनच्या आरती शिंदे, माहेर फाऊंडेशनच्या रजनीताई ताठे, उत्कर्षच्या नयना बनकर, उमंग फाऊंडेशनच्या वैशाली कुलकर्णी, रयतचे पोपट बनकर, सिमोन बनकर, अशोक कासार, जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, मतदार जागृतीसाठी लोककला उपयोगी पडणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात भारुड, शाहीर, वासुदेव, बहुरुपी, पथनाट्य आदी अनेक प्रकारच्या लोककला लोप पावत चालल्या आहेत. त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे सांगितले. तर निर्भीडपणे व कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान घडविण्याचे व १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. आपल्या एका मताची किंमत बहुमोल असून, एका मताने देखील बदल घडू शकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी स्वामी समर्थ मंदिर परिसरात वनौषधी रोपे लावण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी वनौषधींचे मोठे महत्त्व आहे. अनेक देश आयुर्वेदचा स्विकार करु लागले आहेत. दुर्मिळ वनौषधींचे रोपण केल्यास गुणकारी वनौषधीचा लाभ सर्वांना मिळून, पर्यावरण संवर्धन देखील होणार आहे. वृक्ष संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

वृक्षरोपणानंतर चिचोंडी पाटील बस स्थानक परिसरात दुपारच्या सत्रात अमोल बागुल, धिरज ससाणे, आरती शिंदे यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृती केली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles