जलजीवन मिशनच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण
निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धेतून पाणी बचतची जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने जीवन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस प्रदान करण्यात आली. यावेळी जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे आदी उपस्थित होते.
जल जीवन मिशन योजनेची जनजागृती करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकचे विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाली. आणि तालुकास्तरावरून प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. जिल्हास्तरावर प्राथमिक गटांमध्ये निबंध, व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा स्वतंत्र घेण्यात आली. महाविद्यालयीन कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जल जीवन मिशन योजना यशस्वी करण्यासाठी व लोकसहभाग वाढून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व कळण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये स्वतंत्र स्पर्धा घेऊन प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व 5 हजार पाचशे रुपये एवढ्या रकमेचे बक्षीस देण्यात आले. जल जीवन मिशनच्या जागृतीसाठी चलचित्र माध्यमातून लघुपट निर्मिती स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. यामधील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना देखील 31 हजार, 21 हजार व 11 रुपये रकमेचे बक्षीस देण्यात आले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिसाचे स्वरुप होते. विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
–
जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
निबंध स्पर्धा प्राथमिक गटामध्ये प्रथम- श्रीशा प्रसाद सोनवणे (शेवगाव), द्वितीय- श्रेयस प्रदीप वाघ (नगर), तृतीय- अलिया मेहबूब इनामदार, माध्यमिक गट निबंध स्पर्धा प्रथम- जिज्ञासा सागर वैद्य (पारनेर), द्वितीय- ज्ञानदा विशाल भोंडवे (राहुरी), तृतीय- अनुष्का निलेश फलके (शेवगाव).
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा प्राथमिक गट प्रथम- अनुजा नितीन देशमुख (शेवगाव), द्वितीय- जानवी किरण वाव्हळ (राहता), तृतीय- मसीरा मुजेफा शेख, माध्यमिक गट प्रथम- सर्वेश रामदास नरसाळे (पारनेर), द्वितीय- दिव्या सुनील खेतमाळस (कर्जत), तृतीय- प्रताप मदन वाकचौरे (संगमनेर).
वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम- स्नेहल बापू त्रिभुवन (कोपरगाव), द्वितीय- दीक्षा किरण सहाने (संगमनेर), तृतीय- गौरव जगन्नाथ गागरे (श्रीरामपूर), वरिष्ठ महाविद्यालयीन गट प्रथम (विभागून)- कीर्ती रमेश जाधव, जाधव प्रतीक बाबासाहेब, द्वितीय- अभिजीत चंद्रकांत बाविस्कर, तृतीय- प्रणाली पांडुरंग पाटील (श्रीरामपूर),
लघुपट निर्मिती स्पर्धेत प्रथम- विक्रम प्रभाकर लोखंडे, द्वितीय- इंडियन फिल्म प्रोडक्शन, तृतीय- योगेश पाथरकर.
–—–