जिल्हा कौटुंबिक न्यायालयात वीर पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान

- Advertisement -

भारतापुढील आव्हाने सक्षमपणे पेलविण्यासाठी नागरिकांनी विविध कर्तव्य बजवावे – न्यायाधीश संगीता भालेराव

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. हे सर्वच भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिवस असून, भारतापुढे असलेली आव्हाने सक्षमपणे पेलविण्यासाठी प्रत्येक सुजान नागरिकांनी विविध कर्तव्य बजावण्याचे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी केले.

अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय वकील संघ आणि जय युवा अकॅडमीच्या संयुक्त विद्यामाने वीर पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी न्यायाधीश भालेराव बोलत होत्या.

याप्रसंगी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश एस.जी. देशपांडे, द्वितीय न्यायाधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायधीश बी.एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे, ॲड. शिवाजी सांगळे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, ॲड. शिवाजी कराळे, ॲड. उमेश नगरकर, ॲड. गिरीश कोळपकर, ॲड. फारूक शेख, ॲड. कल्याण पागर, ॲड. अनिता दिघे, ॲड. पोपट म्हस्के, ॲड. दिलीपराज शिंदे, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. सुमतीलाल बलदोटा, ॲड. स्वाती नगरकर, ॲड. चैताली खिलारी, ॲड. आशा गोंधळे, ॲड. जय भोसले, ॲड. किरण जाधव, ॲड. बेबी बोर्डे, समुपदेशक राठोड मॅडम आदींसह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी न्यायाधीश भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देश सेवेमध्ये युनिट 17 मराठा मध्ये शहीद झालेले सुभेदार नवनाथ दशरथ वारुळे यांच्या वीर पत्नी लता वारुळे, नाईक आप्पा भानुदास मगर यांच्या वीर पत्नी रोहिणी मगर यांना भारताचे संविधान व सेमी पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दोन्ही वीरपत्नींना आपले अश्रू अनावर झाले होते. त्याचप्रमाणे 200 च्या वर मोफत नेत्र शिबिर आयोजित करणारे व गोशाळा स्वखर्चाने चालविणारे माजी सैनिक मेजर शिवाजी वेताळ आणि भारताच्या संविधानाचे जिल्हाभर प्रती वाटून जागृती करणारे  सामाजिक कार्यकर्ते सुहास सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.

सामाजिक संस्था, पक्षकार, वीर पत्नी आदींच्या सहभागाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम रंगला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शिवाजी सांगळे यांनी केले.

आभार ॲड. लक्ष्मण कचरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय युवा अकॅडमीचे राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, हमीदभाई शेख, उडान फाउंडेशनच्या आरती शिंदे, छावाचे रावसाहेब काळे, दत्ता वामन, दिनेश शिंदे, संतोष लयचेट्टी, बाळासाहेब पाटोळे न्यायालयाच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles