जेऊरगटात भाजपाने फुंकले जिल्हा परिषदेचे रणशिंग;युवा कार्यकर्ते दत्ता तपकिरे यांनी केले मोठे शक्तिप्रदर्शन

- Advertisement -

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार होणारच – खा.सुजय विखे

अहमदनगर प्रतिनिधी – लहू दळवी

जनता प्रश्न सोडवणाऱ्याच्या पाठीमागेच भक्कमपणे उभी राहतेच मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी ३० वर्ष जनतेचे प्रश्न सोडविल्या मुळे आजही जनता त्यांच्या बरोबर आहे.विखे कुटुंबावरही जनता ५० वर्षा पासून भरभरून प्रेम करत आहे.दत्ता तापकीरे हे जनतेशी नाळ जोडून प्रश्न सोडवत आहे.त्यामुळे आज मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले.

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले हे आमदार होणारच आहे.जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या चुकीच्या कामांचा पर्दाफाश करणार आहे.दत्ता तापकिरे यांनी युवकांच्या माध्यमातून मोठे संघटन उभे केले आहे,केंद्र सरकारच्या योजना या युवकांच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करू असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नगर तालुक्यातील जेऊर गटातील शेंडी येथे युवा कार्यकर्ते दत्ता तापकीरे यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील,मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले,अक्षय कर्डिले,बाजीराव गवारे,रावसाहेब कर्डिले,सागर कर्डिले,राजू शेटे,मच्छिंद्र कराळे,बबलू सुर्यवंशी,बाप्पू दाणी,सुनील शिकारे,आप्पा मगर,शितीष पवार,बंडू पवार,सुनील पवार,गणेश आवारे,देविदास आव्हाड,मधुकर मगर,बलभीम कराळे,विकास कोथंबीरे,उद्धव मोकाटे,राजू शेटे,मच्छिंद्र देवकर,बाबा शेख,मुबारक पठाण,गोविंद देवकर,अर्जुन आव्हाड, जाकीर शेख, संजय येवले,मधुकर पाटोळे,अमोल दारकुंडे,देविदास येवले,आदिनाथ बनकर,दिनेश बेल्हेकर,सुभाष पवार, गणेश तवले,पप्पू ससे,बाबा मगर,महेश इंगळे,रोहित तोडमल,राजू दारकुंडे,इंद्रभान विरकर,बाळासाहेब शिकारे,अर्जुन शिकारे,बापू तागड, सोपान शिकारे,संपत बारस्कर,नगरसेवक विनित पाऊलबुधे, निखिल वारे,बाळासाहेब पवार,मनोज कोतकर,सुनील त्रिंबके, संतोष लांडे,अशोक चोभे आदी उपस्थित होते.

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले,जनतेत राहून प्रश्न सोडविल्यास जनता बरोबर राहते जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये जो उमेदवार जनतेत राहून काम करत असेल त्याचा विचार केला जाईल,दत्ता तापकिरे यांनी युवकांचे संघटन करून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम ते करत आहेत भविष्यात अशा युवकांना राजकारणात संधी मिळणार आहे.

विखे कुटुंबीयांशी आमचे जवळचे संबंध आहे कै.बाळासाहेब विखे पाटील यांनी मला अपक्ष आमदार करण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.मी त्यांचा आवडता कार्यकर्ता म्हणून माझी जिल्हाभरात ओळख होती आता ही मा.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी आजही ते ऋणानुबंध आहेत तसेच भविष्यातही असेच ऋणानुबंध राहतील असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना दत्ता तापकिरे म्हणाली क,मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले व खा.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे.युवकांना एकत्रित करून मोठे संघटन उभे केले आहे या संघटनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवत आहोत.

जेऊर गटातिला कार्यकर्त्यांनी साठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.तसेच राजकारणामध्ये मला काम करण्याची संधी दिल्यास या संधीचे नक्कीच मी सोने करेन असे ते म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles