डॉ.रविना चावरे हीचा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते सत्कार
इंग्लंड येथे उच्च शिक्षणासाठी निवड होणे ही अभिमानास्पद बाब – बाळासाहेब बोराटे
नगर – आज प्रत्येक क्षेत्रात मुली बाजी मारत आहेत. शिक्षण क्षेत्रातील विविध पदवी, उच्च शिक्षण घेऊन कुटूंबाचे नाव उज्वल करत आहेत. मनपातील कर्मचारी बंडू चावरे यांची कन्या कु.रविना हीने प्रतिकुल परिस्थितीत एम.बी.बी.एस.चे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर आता तिची इंग्लंड मधील गर्व्हनमेंट कॉलेजमध्ये पुढील उच्च शिक्षणासाठी झालेली निवड ही त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. तिचे हे यश सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी निवड होणे अभिमानाची बाब आहे. पालकांच्या अपेक्षापुर्ती करुन तिचे आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. मुलांना प्रोत्साहन दिल्यास ते आपल्या आवडत्या क्षेत्रात चांगले करिअर करु शकतात हे कु.रविना हीने दाखवून दिले आहे. तिची परदेशी उच्च शिक्षणासाठी निवड इतरांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
डॉ.रविना बंडू चावरे हीची एम.बी.बी.एस.नंतर इंग्लंड येथील गर्व्हनमेंट कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र फुलसौंदर, बंडू चावरे आदि उपस्थित होते.
कु.रविना ही मनपातील कर्मचारी बंडू चावरे व महात्मा फुले विद्यालयातील शिक्षिका कल्पना चावरे याची मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.