ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी महाविद्यालय प्रयत्नशिल – प्रा.कल्हापुरे
अहमदनगर प्रतिनिधी – विजय मते
विद्यार्थ्यांच्या जीवनात प्राथमिक शाळेचे शिक्षण हा पाया असतो तर महाविद्यालयातील शिक्षणामुळे त्यांचे भवितव्य घडून यशाचे शिखर गाठताना कळसापर्यंत पोहचविण्याचे काम कॉलेज करते.आम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांचा सर्वांगिण विकास साधताना शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देतो.यासाठी आमचे महाविद्यालय प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन डॉ.विखे पाटील फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (टेक्नि.) प्रा.सुनिल कल्हापुरे यांनी केले.
डॉ.विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पुणे येथील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी दहा लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.उदय नाईक, आयटी विभागप्रमुख डॉ.दीपक विधाते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा.कल्हापुरे पुढे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरी कशी मिळेल या विवंचनेत विद्यार्थी ग्रासलेला असतो. त्या दृष्टीने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे शिक्षण पुर्ण होताच नोकरी मिळवून देण्यासाठी अनेक वर्षांपासून अनोखा पॅटर्न राबवत असून, त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.
प्रास्तविकात प्राचार्य डॉ.नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिक्षण दिले जाते की जेणे करुन प्रचलित कंपन्यांना आवश्यक ते ज्ञान आत्मसात केलेले मनुष्यबळ उपलब्ध होईल. त्यासाठी विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत असतो. त्यामुळे कंपन्यांना चांगले विद्यार्थी मिळतात व विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळत आहे. यासाठी महाविद्यालय प्रयत्नशिल आहे.

प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे माहिती तंत्रज्ञान विभागातील ऋषीकेश पठानिया, साहिल नागरे, प्रांजल भोरे, शितल भोसले, अनुष्का जोशी, प्रविण मोकाटे, मानसी पालवे, वैष्णवी झिने, तुषार निमसे, प्रज्ञा कडूस, वनिता दारकुंडे, संदेश गाजरे आदिंची पुणे येथील कंपन्यांमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या मुलखतीसाठी प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे,अजित पिंगळे आदिंचे सहकार्य लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आ.राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्य.अधिकारी खा.डॉ.सुजय विखे, सेक्रेटरी डॉ.बी.सदानंदा, डायरेक्टर टेक्नि.पी.एम. गायकवाड आदिंनी अभिनंदन केले.