डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची केएसबी पंप लि. कंपनीत प्लेसमेंटद्वारे निवड
नगर – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभाग व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच यांत्रिकी विभागात बी.ई. मेकॅनिकल पास आऊट विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मुलाखतीमध्ये केएसबी पंप लिमिटेड, वांबोरी येथील कंपनीमध्ये तन्मन मदने, दिग्विजय उगले व प्रजिता गवारे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. या प्रक्रियेमध्ये यांत्रिकी विभागातील एकूण दहा विद्यार्थी शॉर्टलिस्ट होऊन तीन विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर सुदर्शन दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिकी विभागात विविध कॅम्पस मुलाखतीचे नेहमीच आयोजन करण्यात येते. त्यात विविध नामांकित कंपन्या जसे की स्नायडर इलेक्ट्रिक, नील सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, जी के एन सेंटर मेटल्स, इंडोवन्स, केएसबी पंप लिमिटेड अशा कंपन्या सहभागी होत असतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांना निरनिराळ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी प्राप्त होत असते.
सदरील प्लेसमेंट मुलाखतीसाठी यांत्रिकी विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रा.डि.के. नन्नवरे यांनी विशेष प्रयत्न केले. विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. रवींद्र नवथर, फाउंडेशनचे उपसंचालक प्रा. सुनील कल्हापुरे व प्राचार्य डॉ. उदय नाईक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेचे चेअरमन ना.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. सुजय विखे पाटील यांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -