तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अनेक संधी – अमोल सायंबर
नगर – आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे. आज 10वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुणवत्तेनुसार अनेक संधी आहेत. आपण कशात यशस्वी होऊ शकते हे ठरवून त्या क्षेत्रात आपले करिअर करावे. स्पर्धा परिक्षेतील प्रश्न हे आपण शाळेत घेतलेले शिक्षणाशी संबंधित असतात त्यामुळे शालेय शिक्षण महत्वाचे आहे. दुसर्याचा विचार न करता स्वत:बद्दल विचार करुन त्यादृष्टीने मार्गक्रमण केले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारामुळे त्यांना प्रोत्साहन मिळणारच आहे, त्याच बरोबर इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे. तिळवण तेली समाज ट्रस्टच्या उपक्रमातून समाजोन्नत्तीचे चांगले काम होत आहे, असे प्रतिपादन मास्टर माईंड अॅकेडमीचे संचालक अमोल सायंबर यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मास्टर माईंड अॅकेडमीचे अमोल सायंबर, डॉ.राहुल साळूंके, माजी नगरसेवक रमेश गवळी, तौलिक महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र करपे, जिल्हा बालसंक्षण अधिकारी वैभव देशमुख, पो.ना.योगेश घोडके, विजय दळवी, राजेंद्र धारक, गणेश धारक, वैभव शिंदे, गणेश गवळी, योगेश भागवत, पप्पू घोडके, कालिदास क्षीरसागर आदि उपस्थित होते.
वैभव देशमुख म्हणाले, पालक व मुलांनामधील संवाद मोबाईलमुळे कमी होत चालला आहे. मोबाईल जसा गरजेचे आहे, तसा घातकही आहे, त्याचा उपयोग कामापुरताच झाला पाहिजे. शालेय जीवनात मार्क कमी मिळाले तरी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. पालकांनी मुलांच्या कलेने घेऊन त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी द्या, म्हणजे भविष्यात ते नक्कीच यशस्वी होतील, असे सांगितले.
पो.ना.योगेश घोडके यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूकी विषयी माहिती देऊन ऑनलाईन ऑफरला बळी न पडता सोशल मिडियाचा मर्यादीत उपयोग करा. अडचण असल्यास संबंधितांकडे तातडीने तक्रार करा, असे आवाहन केले.
ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, खजिनदार प्रकाश सैंदर, सचिव शोभना धारक, विश्वस्त सागर काळे, गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ.निता लोखंडे आदिंसह ओंकार लोखंडे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दत्तात्रय डोळसे यांनी केले सूत्रसंचालन अक्षदा लोखंडे व गौरी शिंदे यांनी केले तर आभार प्रसाद शिंदे यांनी मानले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी, पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.