नगरच्या कामू मोटर्समध्ये नेक्सॉनच्या विक्रमी विक्रीचा उत्सव साजरा

- Advertisement -

नगरच्या कामू मोटर्समध्ये नेक्सॉनच्या विक्रमी विक्रीचा उत्सव साजरा

नेक्सॉनवर 1 लाख रुपया पर्यंतचा डिस्काऊंट ऑफर जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने लॉन्च केलेल्या नेक्सॉनची 7 वर्षात 7 लाख वाहन विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला असून, देशातील नंबर एकची एसयूव्ही कारचा बहुमान मिळवला असताना देशभर टाटा मोटर्सच्या शोरुममध्ये उत्सव सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसी नगर-मनमाड रोड येथील कामू मोटर्स (मॅक्स मोटर्स) टाटा शोरुमध्ये हा उत्सव साजरा करुन ग्राहकांसाठी 1 लाख रुपया पर्यंतचा डिस्काऊंट ऑफर जाहीर करण्यात आला.

या उत्सव सोहळ्याप्रसंगी रॉयल एनफिल्ड चे रीजनल राईड कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) आसिफ खान, शोरूमचे संचालक सागर कराचीवाला, निखिल कराचीवाला, विशाल कराचीवाला, सेल्स मॅनेजर मुदस्सर शेख आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2017 मध्ये लॉन्च झालेल्या नेक्सॉनने 2021 ते 2023 अशी सलग तीन वर्षे भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही कार ठरली आहे. नेक्सॉनने ग्लोबल एनकॅप कडून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 2018 मध्ये फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त केले. तेव्हापासून हा वारसा चालू आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, नवीन नेक्सॉनने वर्धित 2022 प्रोटोकॉलनुसार पुन्हा फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त केले, तर नुकतेच नेक्सॉन ईव्ही ने या महिन्यात प्रतिष्ठित फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त केले आहे.

41 प्रतिष्ठित पुरस्कारांचे विजेते, नेक्सॉनची उत्कृष्ट कामगिरी त्याच्या वेगवान विक्रीतून दिसून येते. गेल्या दोन वर्षांत (2022 आणि 2023) 3 लाखांहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. अनेक पॉवरट्रेनमध्ये उपलब्ध असलेली नेक्सॉन पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वैशिष्ट्यासह कालांतराने ताकद वाढवली आहे. आकर्षक डिझाइन, सर्वोत्कृष्ट वैशिष्टये कारप्रेमींना भुरळ घालत आहे.

2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून, नेक्सॉनने डिझाइन, सुरक्षितता, आराम आणि ड्रायव्हिंगचा आनंद यामध्ये नवीन मानके स्थापित केली आहेत. गेल्या सात वर्षांत, त्याच्या वाढत्या ग्राहकांच्या अतुलनीय समर्थनामुळे आणि प्रेमाने नेक्सॉनला उद्योगातील एक प्रतिष्ठित ब्रॅण्ड बनवले असल्याचे शोरुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कामू मोटर्स (मॅक्स मोटर्स) टाटा मोटर्स  मधे नेक्सोन हि वाहन वर  नगर, शिर्डी, संगमनेर, येवला, नाशिक, सिन्नर येथील शोरुममध्ये 15 ते 30 जून पर्यंत एक लाख रुपये पर्यंत डिस्काउंट ग्राहकांना दिला जाणार आहे. यासाठी ग्राहकांना त्वरीत बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles