वयोश्री योजना ठरली ज्येष्ठांसाठी नवसंजीवनी – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून राबवली यशस्वीरीत्या वयोश्री योजना
अहमदनगर प्रतिनिधी – ज्येष्ठांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर वयोश्री योजना अमलात आणली व नगर दक्षिणेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी नियोजनपूर्वक ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संदर्भात आधार देण्याचे काम केले आहे.
वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणा संदर्भात आपल्या आरोग्यासाठी विविध वस्तूंची उपलब्धता या योजनेअंतर्गत होणार आहे.आता ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून ऑनलाईन नाव नोंदणी नगर दक्षिणेत पूर्ण होऊन ११ हजार ०४८ ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना ज्येष्ठांसाठी नवसंजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.
केडगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत मोफत तपासणी व नाव नोंदणी शिबिराची पाहणी करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर,बाजार समितीचे उपसभापती संतोष मस्के, नगरसेवक राहुल कांबळे,सुनील कोतकर,गणेश नन्नवरे,नगरसेविका लताबाई शेळके,सुरेश सुंबे,दिलीप भालसिंग,शिवाजी कार्ले,सुनील मामा कोतकर,भैरू कोतकर तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नगर दक्षिण मतदार संघामध्ये खा.सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून ११ हजार ०४८ ज्येष्ठांनी वयोश्री योजनेचा लाभ घेतला यामध्ये नगर शहर २३४३,पारनेर३८२,राहुरी ५४१, पाथर्डी ५३०,शेवगाव ३५४,कर्जत ५८३,श्रीगोंदा ८३१,जामखेड ९८१, पिंपळगाव माळवी ३९८,वाळकी ६७५,भिंगार ९२४,केडगाव ९२० आदींसह ज्येष्ठांनी वयोश्री योजनेचा लाभ घेतला.