श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
नागरिकांना उपचार घेत असताना रक्तपिशवीची आवश्यकता भासत असते – ॲड धनंजय जाधव
नगर : समाजामध्ये विविध आजारपणाचे संक्रमण होताना दिसत असून नागरिकांना उपचार घेत असताना रक्तपिशवीची आवश्यकता भासत असते .मात्र दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ही काळाची गरज बनली आहे .रक्तदान हे जीवन दान असून सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे व रुग्णांची मदत करावी समाजामध्ये काम करीत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडावे, सण उत्सव वाढदिवस साजरे करीत असताना विविध सामाजिक उपक्रम राबवावे जेणेकरून समाजाप्रती ऋणानुबंध निर्माण होत असतात .पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतः रक्तदान करीत समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन ॲड धनंजय जाधव यांनी केले.
श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व ॲड. धनंजय जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी ॲड.धनंजय जाधव,मितेश शहा,संजय बोगा,राहुल मुथा,दिनेश नल्ला,महेश महादर,निखिल बिल्ला,राहुल गोंधळे,ऋतिक आडेप, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर आदी उपस्थित होते.