नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने हनुमान जयंती साजरी

नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने हनुमान जयंती साजरी

शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजे बजरंगबली – गणेश कवडे

नगर – शक्ती आणि भक्तीचा मिलाप म्हणजे बजरंगबली होय. प्रभु रामचंद्रांची नि:स्सीम भक्ती करुन निष्ठा कशी असावी भगवंत हनुमानांनी आपल्या सेवेतून दाखवून दिले आहे. हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकृत  करण्याची गरज आहे. हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटपातून सामाजिक ऐक्य निर्माण होण्यास मदत होते. प्रसादाचे माहत्म्य मोठे असल्याने भाविकांना लाभ घेऊन तृप्त होत आहे. ही तृप्तीच आपणा सर्वांना समाधान देणारी आहे, असे प्रतिपादन मनपा माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.
हनुमान जयंतीनिमित्त नाना पाटील वस्ताद तालिमच्यावतीने  कावडीने आणलेल्या पवित्र पाण्याने अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी गणेश कवडे, रामभाऊ नळकांडे, बापू शेळके, नितीन रोहोकले, मळू वामन, दत्ता ठागणे, अतुल वाकचौरे, बजरंग महाराज शेळके, बापू दिवेकर, राजु म्हस्के, पप्पू गुंजाळ, पै. मन्नी शिंदे, अनिल कवडे, ओंकार कवडे, निलेश काळे, बाळू काळे, शैलेश काळे, सोहम वाव्हाळ, शाम शिंदे, शंभुराज भुतकर, पै.अमर शिंदे आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना गणेश कवडे म्हणाले, हनुमान जयंतीची नालेगांवची मोठी परंपरा आहे. दरवर्षी नालेगांव येथील नाना पाटील वस्ताद तालिम येथील युवकांनी सालाबाद प्रमाणे प्रवरासंगम येथून कावडीने पाणी आणून जलाभिषेक केला जातो. युवकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री हनुमानाची उपासना करुन अनेक कुस्तीची मैदानी गाजवली आहेत.  नाना पाटील वस्ताद तालिम सध्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून, लवकर ते काम पुर्णत्वास येऊन व एक आधुनिक तालिम या पहिलवांनासाठी सज्ज असेल, असे सांगितले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

Click to scroll the page