निमगाव वाघात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा गौरव व गावात मतदार जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आला. तर गावात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.
प्रारंभी नवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच लताबाई फलके, माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, प्रमोद जाधव, चंद्रकांत पवार, अतुल फलके, संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, लहानू जाधव, सांगळे गुरुजी, मुख्याध्यापिका नलिनी भुजबळ, अरुण फलके, संगिता आतकर, गोरख फलके, नामदेव फलके, बाबा जाधव, तृप्ती वाघमारे, मयुरी जाधव, मंदा साळवे, भागचंद जाधव, अमोल वाबळे, तेजस केदारी, राम जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे यांनी ग्रामपंचायत मधील कामगार वर्गाला कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्मा झालेल्यांना आदरांजली वाहिली. श्रमिक कामगारांमुळे महाराष्ट्र व देशाची विकासात्मक वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांना अमिषाला बळी न पडता, निर्भय व धर्मनिरपेक्षपणे मतदान करुन मतदानाचा हक्क बजावण्याचा व लोकशाही सक्षम करण्याची शपथ देण्यात आली. तसेच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे आदीची माहिती देण्यात आली.