अहमदनगर (प्रतिनिधी)- मामाकडे गेलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिश दाखवून, फूस लावून पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यामध्ये घडला असून संबंधित मुलीचा तात्काळ शोध लावा अशी मागणी तिच्या घरच्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असताना यावर कोणताही तपास न झाल्याप्रकरणी आज जनार्दन जाधव यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले
यावेळी जनार्दन जाधव, अण्णासाहेब जाधव,भगवान जाधव, दत्तात्रय जाधव, दादाहरी रोटे, संदीप जाधव, दत्ता शेटे, मीना जाधव, जिजाबाई जाधव, श्रीधर जाधव, चीलूभाऊ तुवर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
जनार्दन जाधव यांची मुलगी ही अल्पवयीन असून ती १५ ऑगस्ट रोजी तिचे मामा बजरंग माकोणे राहणार, नेवासा यांच्याकडे ती गेली असतात या ठिकाणी अशोक नागरे राहणार वाळुंजपोई, तालुका राहुरी याने दिनांक १७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमाराला त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिला पळून नेले घटना उलटून पंधरा दिवस झाले तरीही त्या मुलीचा शोध लागायला तयार नाही.
या संदर्भामध्ये जाधव कुटुंबीयांनी मागील पंधरा दिवसापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील याना निवेदन देऊन त्यांना याबाबतची हकीकत कशी घडली याचे त्यांना निवेदन दिले होते, तसेच नेवासा पोलिस ठाण्यांमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली होती मात्र वारंवार घरच्यांनी पाठपुरावा करून देखील सुद्धा त्या मुलाचा छडा लागायला तयार नाही. चार दिवसापूर्वी जाधव कुटुंबीयांनी जर मुलीचा तपास लागला नाहीत आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिलेला होता. त्यानुसार आज सकाळी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाधव कुटुंबियांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे
या संदर्भामध्ये जनार्दन जाधव यांनी आम्ही वारंवार पोलिसांकडे मुलीचा शोध लागला की नाही याची विचारणा केली मात्र आम्हाला उडवाउडवीचे उत्तरे मिळालेले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मुलीचा शोध लागत नाही पोलिसांनी तात्काळ त्याचा तपास आवश्यक होते मात्र तसे झाले नाही, म्हणून आता आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही आमची मुलगी अल्पवयीन आहे व तिला फूस लावून पळवून नेले असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.