पाईपलाईनरोड परिसरात महिलांनी वृक्षारोपण करुन साजरी केली वटपौर्णिमा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाईपलाईनरोड परिसरात महिलांनी वृक्षारोपण करुन साजरी केली वटपौर्णिमा

नगर – वटपौर्णिमेनिमित्त पाईपलाईन रोड येथील कजबे वस्ती परिसरातील तुळजाभावनी मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला महिलांनी फेर्‍या मारुन पुजा केली. याप्रसंगी सौ.शोभा दातीर, सौ.सुनिता ठोंबरे, सौ.प्रांजली कुलकर्णी, सौ.लक्ष्मी कजबे, सौ.वृषाली शिरसाठ, सौ.अलका बारस्कर, सौ.ज्योती वाव्हाळ आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सौ.शोभा दातीर म्हणाल्या, भारतीय संस्कृतीत सण, उत्सव हे आरोग्य रक्षण व निसर्गाशी समरस असे आहेत. या सगळ्यांचा विचार केल्यास आयुर्वेदिक परंपरेला चालना देणारे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रीयांनी उपवास करावा, वृटवृक्षाचा सान्निध्यात रहावे, मैत्रिणीबरोबर हसत खेळत वेळ घालवावा. याच बरोबरच आध्यात्मिक कथेनुसार सती सावित्रीने यमदूताकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले अशी अख्यायिका आहे. त्यामुळे आपल्या पतीच्या दीर्घाष्युसाठी व जन्मोजन्म हाच पती मिळावा, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जात आहे, हा सण आपल्या जीवनात आनंद घेऊन येणार असल्याचे सांगितले.

वनरक्षक सौ.सुनिता ठोबरे म्हणाल्या, सध्या ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजे ही काळाजी गरज आहे. आपल्या सण-उत्सवातून निसर्गाचे महत्व विषद केले आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे. वनविभागाच्यावतीने सुरु असलेल्या वनोत्सवाअंतर्गत नागरिकांना मोफत वृक्षाचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक महिलेने वटपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते वडाची पुजा करण्याबरोबरच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महिलांना बीज वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!