पावसाळ्यानिमित्त भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप
भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक उपक्रम
भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क समोर वृक्षांची लागवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिक्षेकरी व गरजू ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. रोकडेश्वर हनुमान मंदिरात गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन व मिठाईचे वाटप करण्यात आली. तर भिंगारच्या भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क समोर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भिंगार राष्ट्रवादीच्या माध्यमातून सदरील सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर व कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे यांच्या हस्ते गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनासह छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सर्वेश सपकाळ, रमेश वराडे, अभिजीत सपकाळ, जाहीर सय्यद, कलीम शेख, सुरेश मेहतानी, मीनाताई मेहतानी, मेजर दिलीपराव ठोकळ, सचिन चोपडा, विशाल भामरे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, संपत बेरड, विलास तोडमल, अमोल लगड, बाबासाहेब बारस्कर, दीपक गांगर्डे, महेंद्र गलांडे, गिरीश जगताप, अशोक पराते, अविनाश जाधव, दीपक लिपाने, शिवम भंडारी, मतीन ठाकरे, दीपक राहिंज, आनंद क्षीरसागर, अक्षय नागापुरे, फरीद सय्यद, शिवांश शिंदे, पप्पू मोरे, अजिंक्य भिंगारदिवे, अशोक लोंढे, राहुल भिंगारदिवे, विलास मिसाळ आदी उपस्थित होते.
संपत बारस्कर म्हणाले की, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने या उपक्रमातून खऱ्या गरजवंतांना आधार देण्यात आला आहे. समाजाचे काही तरी देणे लागते, ही प्रत्येकाने जाणीव ठेऊन योगदान द्यावे. सपकाळ भिंगार राष्ट्रवादी व हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक चळवळ चालवित आहे. सर्वांना बरोबर घेऊन त्यांची चळवळ दिशादर्शक उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ म्हणाले की, भिंगारच्या विकासात आमदार संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे. विकास कामासाठी त्यांनी नेहमीच निधी उपलब्ध करुन दिला. अनेक प्रलंबीत प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांच्या विचाराने व मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादीची वाटचाल सुरु आहे. भविष्यात त्यांची राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागून राज्याची सेवा घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाज व निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक चळवळ सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोकडेश्वर हनुमान मंदिर येथील भिक्षेकरी व ज्येष्ठ नागरिकांना पाऊसापासून संरक्षण होण्यासाठी छत्र्या देण्यात आल्या. तर जॉगिंग पार्क समोर वृक्षाची लागवड करण्यात आली.