प्रचार सोडून आ. लंके बसले देणग्या स्विकारायला !
निघोजच्या मळगंगा यात्रोत्सवास हजेरी
दरवर्षीप्रमाणे आ. लंके यांचा यंदाही सेवाभाव
निघोज : प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्यापुढे तगडे आव्हान उभ्या केलेल्या आ. नीलेश लंके यांनी निघोजच्या मळगंगा देवीच्या यात्रोत्सवाचे औचित्स साधून प्रचार बाजूला सारत दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या देण्याच्या स्विकारण्याची जबाबदारी पार पाडली. मोठा मतदारसंघ आणि हायहोल्टेज लढत असतानाही लंके यांनी आपला सेवाभाव न चुकता पुर्ण केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
निघोज ही माझी मायभुमी आहे. मळगंगेचा आशिर्वाद असल्याने आपणास सामाजिक कामासाठी मळगंगा मातेेचे पाठबळ मिळते. त्यातूनच सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची ऊर्जा मिळते असे आ. लंके हे नेहमी सांगतात. दरवर्षी मळगंगा देवीच्या घागर मिरवणूकीच्या दिवशी न चुकता ते हजेरी लावतात. मिरवणूकीत सहभागी झाल्यानंतर देणगीच्या सभामंडपात येउन ते पावतीपुस्तक हाती घेतात. तासभर हा सेवाभाव केल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा यंदा लोकसभा निवडणूकीच्या धामधूमीतही आ. लंके यांनी कायम राखली.
राज्याच्या विविध भागांसह जिल्हयातील राहुरी, नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, कर्जत-जामखेड आदी भागांतील भाविक यावेळी उपस्थित होते. अनेक भाविकांनी उमेदवार नीलेश लंके यांना पावत्या करताना पाहून त्याच्या कामाचे वेगळेपणे नेहमीच जाणवत असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.
चौकट
लोकनेता असावा तर असा
लोकसभा निवडणूकीचा प्रचार रंगात आला असून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. येत्या १३ तारखेला मतदान असल्याने प्रत्येक दिवस व दिवसाचा क्षण ना क्षण उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे.असे असतानाही आ. लंके यांनी आपल्या सेवाभावाचा विसर पडू न देता देणगी पावत्या करण्यासाठी तासभर वेळ दिल्याने भाविकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत होते. लोकनेता असावा तर असा अशा अपसूक प्रतिक्रीया भाविकांकडून येत होत्या.