प्रतिकूल परिस्थितीतही प्राथमिक शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी ! खासदार निलेश लंके

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

प्रतिकूल परिस्थितीतही प्राथमिक शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी !
खासदार निलेश लंके

मुख्याध्यापक फटांगडे, वाबळे व शितोळे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न !

गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेकडो यशस्वी विद्यार्थ्यांची आवर्जून उपस्थिती !

पारनेर प्रतिनिधी :श्रीकांत चौरे

सुसंस्कृत पिढी घडवीण्याचा अखंडित प्रयत्न करत ज्ञानदाना सारखे पवित्र दान देणारे हजारो शिक्षक आजवर पारनेर तालुक्याने राज्याला दिले आहे.पारनेर तालुका म्हणजे ज्ञानवंत,गुणवंताचा खजिना आहे .हे आजवर महाराष्ट्राने पाहिले आहे .शिक्षण क्षेत्रामध्ये मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे, मुख्याध्यापक अशोक वाबळे, मुख्याध्यापक राजेंद्र शितोळे यांनी अविरतपणे 36 वर्षे सेवा करून अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले त्यामुळे या सर्वांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे असून प्रतिकूल परिस्थितीतही प्राथमिक शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेशजी लंके यांनी दुर्गा लॉन्स वाडेगव्हाण ता.पारनेर येथे आयोजित सेवापूर्ती समारंभामध्ये काढले.दुर्गा लॉन्स मंगल कार्यालयामध्ये मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे,मुख्याध्यापक अशोक वाबळे, मुख्याध्यापक राजेंद्र शितोळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे हे होते.

यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानदेव लंके गुरुजी, शिक्षण निरीक्षक (माध्यमिक शिक्षण) श्रीराम थोरात,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख गोकुळ कळमकर,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडुंगे,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे,शिक्षक नेते आबासाहेब दळवी,शिक्षक बँकेचे संचालक कारभारी बाबर, सूर्यकांत काळे,महेश भनभणे, जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस प्रकाश नांगरे, शिक्षण विस्तार अधिकारी गोवर्धन ठुबे, भाऊसाहेब साठे, भाऊसाहेब काळे,अहमदनगर जिल्हा विकास मंडळाचे मा. सचिव व विद्यमान विश्वस्त संतोष मगर,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नेते राजेंद्र ठोकळ,सचिन नाबगे, गुरुदेव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर, शिक्षक संघ नगर तालुका अध्यक्ष गहिनीनाथ पिंपळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणाने मुलांचा चांगला विकास  होतो. जिल्हा परिषद शाळांमधून दिले जाणारे शिक्षण हे मातृभाषेतून मिळते त्यामुळे येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेले अनेक अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेले आहेत.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या गुणवत्ता पूर्व शिक्षण देणाऱ्या शाळा मानल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांनी आज लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जातात ही खूप कौतुकास्पद बाब आहे.

सेवानिवृत्त होत असलेल्या तीनही मुख्याध्यापकांनी त्यांच्या सेवाकालात अनेक विद्यार्थी घडविले त्यांचे विद्यार्थी आज विविध पदावर काम करत आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असून आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहे हीच या शिक्षकांची आयुष्यभर केलेल्या कामाची मोठी पावती व मोठा सन्मान मानतो फटांगडे, वाबळे, शितोळे यांनी केलेल्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनीही या तिन्ही शिक्षकांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील दिलेल्या भरीव योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून त्यांच्या भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.खासदार निलेशजी लंके व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक बाळासाहेब फटांगडे,मुख्याध्यापक अशोकराव वाबळे,मुख्याध्यापक राजेंद्र शितोळे यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे निमित्ताने माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण निरीक्षक श्रीराम थोरात शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख गोकुळजी कळमकर, जिल्हाध्यक्ष बबनदादा गाडेकर, विस्तार अधिकारी गोवर्धन ठुबे, मा. प्राचार्य रामचंद्र सुपेकर,भाऊसाहेब डेरे यांच्यासह आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश नांगरे शिक्षक संघाचे दक्षिण जिल्हा प्रमुख गौतम साळवे संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गट, गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संदीप ठाणगे, रवींद्र रोकडे चंद्रकांत मोढवे,अनिल इकडे,दादाभाऊ कोल्हे,सतीश परांडे,अश्फाक शेख,गणेश कोहकडे,परशुराम ठोंबरे, राजू आत्तार,अशोक कळमकर, रमेश रोहकले,गणेश भोसले, सचिन परांडे यांच्यासह आदींनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आणि कवी संजय ओहोळ प्रास्ताविक शिक्षक नेते आबासाहेब दळवी व आभार तालुकाध्यक्ष चंद्रकांत गट यांनी मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!