प्रत्येक गावात कोट्यावधींचा निधी दिला – आ. नीलेश लंके यांचे प्रतिपादन

- Advertisement -

प्रत्येक गावात कोट्यावधींचा निधी दिला

आ. नीलेश लंके यांचे प्रतिपादन

कान्हूरपठार येथे आढावा बैठक

कान्हूरपठार : प्रतिनिधी

सन २०१९ मध्ये पारनेर-नगर मतदारसंघातील जनतेने तब्बल साठ हजार मतांच्या विक्रमी मताधिक्क्याने विधानसभेत पाठविल्यानंतर मतदारसंघातील विकास कामांसाठी दिवसरात्र झटलो. कोणताही राजकिय अभिनिवेश न पाहता प्रत्येक गावामध्ये कोटयावधी रूपयांचा निधी देत मतदारसंघ वेगळया उंचीवर नेऊन ठेवला. याच कामाची पावती म्हणून मला मतदारसंघात किमान १ लाखांचे मताधिक्य मिळेल असा विश्‍वास आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर कान्हूरपठार गणातील वेसदरे, पिंपळगांव तुर्क, वडगांव दर्या, विरोली, पिंपरी पठार, करंदी, किन्ही, जाधववाडी या गावांतील नागरीकांशी कान्हूरपठार येथे पार पडलेल्या बैठकीत आ. लंके यांनी संवाद साधला. यावेळी लंके यांनी प्रत्येक गावातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला.

यावेळी बोलताना लंके म्हणाले, पाच वर्षात तळा गाळातील सर्व घटकांना न्याय देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला.कोणताही भेदभाव न करता आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम मार्गी लावले. पक्ष, पार्टी असा भेदभाव कधीही केला नाही.

लंके पुढे म्हणाले, नीलेश लंके नेहमीच समाजासाठी जगला, स्वतःसाठी मी कधीच काही मागितले नाही. मतदारसंघाच्या भल्यासाठी दिवसरात्र झटलो. कोटयावधींचा निधी उपलब्ध केला. या बैठकीस राजेंद्र चौधरी, मारूती रेपाळे, शिवाजी औटी, शालिनी घुले, प्रियंका खिलारी, सुभाष नवले, शिवाजी व्यवहारे, डी.सी.व्यवहारे, महेंद्र गायकवाड, भागाजी नवले, चंद्रभान ठुबे, शिवाजी शेळके, किरण ठुबे, प्रसाद नवले, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुनिता गायखे, सविता ठुबे, अनिल तिकोणे, उत्तम गायकवाड, सुलोचना शिंदे, भास्कर गव्हाणे, शिताल पागिरे, दत्ता गुंड, चंदू खोडदे, त्रिंबक मुळे, प्रशांत बोरूडे, लहू बुचूडे, अशोक राऊत, बबन ठुबे, अशोक शेळके, प्रशांत राऊत आदी उपस्थित होते.

▪️चौकट

मायबाप जनता हीच माझी संपत्ती

आमदार झाल्यानंतर आमदारांचे कारखाने बंगले उभे राहतात. माझी संपत्ती मात्र आमदार झाल्यानंतर घटली, कर्जही वाढले. मला संपत्तीचा कधीही हव्यास नव्हता व यापुढील काळातही नसेल. मायबाप जनता हीच माझी लाख मोलाची संपत्ती असल्याचे लंके म्हणाले.

▪️चौकट

डफडयावाल्यांमध्ये स्पर्धा !

लंके म्हणाले, विरोधकांचे तालुक्यात चार-दोन डफडयावाले आहेत. विरोधकांची डाळ आणि गुळ वाटण्यासाठी डफडयावाल्यांमये जणू स्पर्धाच लागली होती. विरोधकांचे मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी त्यांना त्यांचे मोबाईल रिचार्ज मारून द्यावे लागते इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आल्याची टीका लंके यांनी केली.

▪️चौकट

प्रत्येक गावात काम

आमदार म्हणून काम करण्याची संधी मतदारांनी दिल्यानंतर या संधीचे सोने करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली. शासनाच्या विविध योजना गावागावांमध्ये राबवून विकास कामांचे जाळे निर्माण केले. प्रत्येक गावामध्ये किमान एक कोटी रूपयांचे काम करून आपण आपल्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविल्याचे लंके म्हणाले.

▪️चौकट

माजी सैनिकांकडून निवडणूक निधी

आ. नीलेश लंके हे मोठया शक्तीविरोधात ही निवडणूक लढवित असून त्यांना मदत म्हणून कान्हूरपठारमधील माजी सैनिक गणेश गायखे, संपत ठुबे, हरी व्यवहारे यांनी एक महिन्यांची पेन्शन निवडणूक निधी म्हणून आ. लंके यांच्याकडे सुपूर्द केली.

▪️चौकट

आपला गुलाल फिक्स !

धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी ही लढत आहे. सर्वसामान्य शिक्षकाच्या घरातील उमेदवाराविरोधात प्रचार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नगरमध्ये येत आहेत यातच माझा विजय निश्‍चित आहे. आजवर आपण आपल्या देशाचे पंतप्रधान दुरचित्रवाणीवर पाहिले. या निवडणूकीच्या निमित्ताने पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री यांना नगरमध्ये यावे लागते तरीही आपला गुलाल फिक्स असल्याचा आत्मविश्‍वास लंके यांनी व्यक्त केला.

▪️चौकट

विरोधक हतबल

आपण या निवडणूकीमध्ये उतरल्यानंतर मतदारांनीची ही निवडणूक हाती घेतली आहे. पारनेर-नगर मतदारसंघासह लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारीस मोठा प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक हतबल झाले आहेत. पारनेरमध्ये आपल्याला रोखण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला, मात्र त्यातही त्यांना यश आले नसल्याचे लंके यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles